Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: ‘I Love You राजवाडे…’; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश


Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री (Marathi Actress) तेजश्री प्रधानचा (Tejashri Pradhan) चाहतावर्ग खूप मोठा  आहे. तिनं अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिकाही साकारलीय. तेजश्री सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghatli Tutena) या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिची मुख्य भूमिका आहे. स्वानंदीची व्यक्तीरेखा साकारुन तिनं अनेकांची मनं जिंकली आहेत.  या मालिकेत सुबोध भावेही मुख्य भूमिकेत झळकतोय. या मालिकेतील स्वानंदी आणि समर या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतोय. सध्या मालिकेत समर-स्वानंदीच्या प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. समरनं स्वानंदीला आपल्या मनातलं सांगितलंय. त्यानं त्याचं स्वानंदीवरचं प्रेम व्यक्त केलंय. पण, स्वानंदी त्याला अजून उत्तर दिलेलं नाही. 

समर स्वानंदीसाठी अनेक सप्राईज देतो. तिला झाडं लावायला आवडतात, म्हणून एक मोकळी जमीन खरेदी करुन देतो. त्यानंतर मुंबईच्या वरळी सी-लिंकवर तिच्यासाठी ‘I Love You स्वानंदी’ असा मॅसेज लिहतो. तर, तिच्या नावाचे बॅनरही लावतो. समरची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाहून स्वानंदी भारावून जाते. पण, समरनं एवढं करुनही ती काही त्याला उत्तर देत नाही. उलट ती समरकडे वेळ मागते. त्यामुळे समर काहीसा निराश होतो. आता या मालिकेच्या नव्या प्रोमोनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. कारण, या प्रोमोमध्ये वटपौर्णिमेचा ट्रॅक दाखवण्यात आला असून स्वानंदी समरला थेट ‘राजवाडे I Love You’, असं म्हणत आपलं प्रेम व्यक्त करते. स्वानंदीच्या तोंडून प्रेमाचे शब्द ऐकून समर खूपच आनंदी होतो. 

प्रोमोमध्ये नेमकं दिसतंय काय? (Veen Doghantli Hi Tutena Promo)

स्वानंदी प्रेम व्यक्त करत नसल्यानं समर नाराज होतो. तो म्हणतो, “जर आपल्या नात्यात प्रेम नसेल, तुम्हाला माझ्याविषयी कोणत्याही भावना नसतील तर वटपौर्णिमेची पूजा करू नका…” त्यावर स्वांदी समरची मजा घेण्यासाठी ‘पूजा करणार नाही…’ असंही म्हणते. पण, वटपौर्णिमेच्या दिवशी समर येईल का? याची स्वानंदीला चिंता असते. जेव्हा ती पुजेच्या ठिकाणी पोहचते, तेव्हा तिला धक्काच बसतो. कारण, समर तिच्या आधीच पुजेच्या ठिकाणी पोहोचून वडाला फेऱ्या मारत असतो. 

समर तिथं आधीच इतर महिलांसोबत स्वानंदीसाठी वडाची पूजा करताना पाहून स्वानंदी भारावून जाते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. स्वानंदीला पाहताच समर म्हणतो, “तुम्ही माझ्यासाठी उपवास केलात. तुमच्या दीर्घायुषासाठी मी पूजा करणार आहे. मला माझी बायको दीर्घायुषी असायला हवीय, म्हणून मी पूजा केली. समर एवढा विचार करतोय ते पाहून स्वानंदी खूश होते. ती त्याला म्हणते, “जेवढे सुद्धा जन्म घेईल तेव्हा जोडीदार म्हणून मला तुम्हीच हवे आहात…” त्यावर समर चिडतो आणि म्हणतो, “हे माझ्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं नाही…” त्यावर स्वानंदी त्याला “I Love You राजवाडे… माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे…”, असं म्हणत लाजते. स्वानंदीचं उत्तर ऐकून समरचा आनंद गगनात मावेनासा होतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *