Ketan Murder Case: तो ‘हुडी मॅन’ आणि चेतन एकच? केतन अग्रवाल खूनप्रकरणात मोठा ट्विस्ट… घरातून बाहेर पडताना त्याचा ड्रेस तर वेगळाच… – Marathi News | Ketan Agarwal Lohgad Murder Case Are the Hoodie Man and Chetan the same person A major twist in the Ketan Agarwal murder case His attire was completely different when he left the house


तो ‘हुडी मॅन’ आणि चेतन एकच?Image Credit source: एजन्सी

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात अजून एक वळण आले आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून धक्का देत त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. उद्यापर्यंत दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलीस विविध बाजूने तपास करत आहेत. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. डिजिटल पुराव्यांसह सीन रिक्रएशनही करण्यात आले. दोघांनाही लोहगडावरून नेऊन पोलिसांनी पुतळा फेकायला लावण्यात आला. आता याप्रकरणात अजून एक खुलासा समोर येत आहे.

घरातून निघताना वेगळेच कपडे

केतन अग्रवाल याचा काटा काढण्याचा बेत सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी अनेक महिन्यांपूर्वी आखला. दोन ते तीन अयशस्वी प्रयत्नही झाले. पण केतनला कायमचे संपवायचेच या विचाराने दोघांनी पुन्हा 18 जून रोजी त्याला लोहगडावर नेले. केतनला चेतनने कड्यावरून ढकल्याचा आरोप करण्यात येतो. तो लोहगडवर हुडी घालून फिरत होता. तो या परिसरात 40 मिनिटेच होता. लोहगडावर चढायला आणि उतरायचा वेळ कमी केला तर तो मोजून 5 ते 10 मिनिटे गडावर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना तपास करताना अजून एक दुवा हाती लागला आहे. गडावर चढताना चेतन हुडीवर दिसत असला तरी घरातून निघताना मात्र त्याने वेगळेच कपडे घातलेले होते. आपल्यावर कुणाला संशय येऊ नये यासाठी त्याने हा कपडे बदल केला.

गुन्ह्यानंतर कोणीही लवकर ओळखू नये यासाठी त्याने कपडे बदलल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरा लपवत हुडी घातलेला तरूण झटपट गड उतरताना दिसतो. तो चेतन असल्याचे तपासाअंती उघड झाले. पण त्याने घरातून निघताना आणि घरी परत जाताना मात्र वेगळाच पोषाख घातला होता. त्याने हे कपडे कुठे बदलले आणि हे कपडे कुठे लपवले याचा शोध पोलीस घेत आहेत.

दोघांना उद्या न्यायालयात हजर करणार

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना केतन अग्रवाल हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणात त्यांना आता तिसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. उद्या दोघांची पोलीस कोठडी संपत आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांना पाच दिवसांची (3 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. पोलीस दोघांविरोधात भक्कम पुरावे गोळा करत आहेत. डिजिटल पुराव्यांची मोठी मालिकाच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. डिलिट केलेल्या चॅटमधून मोठा पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *