Jalgaon Accident News: हातावरची मेहंदी पुसत नाही तोच काळाचा घाला; माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू, जळगावमध्ये काळीज चिरणारा आक्रोश


Jalgaon Accident News: लग्नाच्या आनंदावर अवघ्या सहा दिवसांतच दु:खाची काळी छाया पसरल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (13 जुलै) जळगाव शहरात घडली. माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या 21 वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (Vaishali Patil) यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले. 

वैशाली यांचा विवाह 7 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. देवदर्शन करून नुकतेच घरी परतलेल्या वैशाली सोमवारी माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि नव्याने सुरू झालेला संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाला. घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माहेर व सासरच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत चारचाकी वाहनाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. (Jalgaon Accident)

सोमठाणे घाटात खाजगी लक्झरी प्रवासी बस उलटली, एक जण जागीच ठार, तर 5 ते 6 प्रवासी जखमी- (Somthane Bus Accident)

येवला–नांदगाव राज्य महामार्गावरील सोमठाणे जोश घाटात आज पहाटे एक खाजगी प्रवासी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. बस पलटी झाल्याने प्राथमिक माहितीनुसार एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातावेळी बसमध्ये सुमारे 25 ते 26 प्रवासी प्रवास करत होते. जखमींना तातडीने उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे. बस रस्त्यावरच आडवी झाल्याने  नांदगाव – येवला रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.

कोल्हापुरात रस्ते अपघातातील जखमीचा मृत्यू , खड्ड्यात मृतदेह ठेवून निषेध- (Kolhapur Accident News)

गारगोटी राज्य मार्गावर कळंबा साई मंदिर नजीक खड्ड्यांमुळे दुचाकीच्या धडकेत झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता.  उपचारादरम्यान या व्यक्तीचा काल मृत्यू झाला. यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईक आणि नागरिकांनी काल सायंकाळी मृत राजेंद्र गायकवाड यांचा मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवून जोरदार निदर्शने केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोल्हापूर  गारगोटी राज्य मार्गावर कळंबा येथे राहणाऱ्या राजेंद्र गायकवाड दोन दिवसांपूर्वी रस्त्यावरून जात असताना भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वाराने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात राजेंद्र यांना जोरदार धडक दिली होती त्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारासाठी खाजगीर होणाऱ्या दाखल केले परंतु उपचाराला राजेंद्र यांनी प्रतिसाद दिला नाही शनिवारी  त्यांचा मृत्यू झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी नातेवाईकांनी राजेंद्र गायकवाड यांची काल अंत्ययात्रा काढली होती यावेळी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी अपघात झालेल्या राज्य मार्गावरील खड्ड्यात राजेंद्र यांचा मृतदेह ठेवून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. 

दरम्यान या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिकेने आपले स्पष्टीकरण प्रसारित केले आहे. राजेंद्र गायकवाड यांचा अपघात होण्यास कारणीभूत असणाऱ्या तरुणांकडे स्पोर्ट्स बाईक होती तसेच एका बाईकवर तिघेजण मध्यतून अवस्थेत स्वार झाले होते. भरधाव वेगाने येणाऱ्या या स्पोर्ट्स बाईक चा ताबा सुटलेले हा अपघात झाल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. गेले आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एका बाजूला राजेंद्र गायकवाड यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार खड्डे चुकवताना दुचाकी स्वाराने राजेंद्र गायकवाड यांना धडक दिल्याचे म्हणणं आहे. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेने हा अपघात मद्यधुंदी अवस्थेत असणाऱ्या वाहन चालकांनी केल्याचं म्हणणं आहे. या संदर्भात अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: ताप आल्याने गोळ्या खाल्ल्या, ग्लानी आली अन् हादरवणारं घडलं; वारीतील ट्रक 20 वारकऱ्यांना धडकला, 3 महिलांचा जागीच मृत्यू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *