Solapur: पोटाला चिमटा घेऊन लेकांना मोठं केलं, लग्नानंतर त्यांनीच घराबाहेर काढलं, आईवडिलांनी असा शिकवला धडा | सोलापूर बातम्या


Last Updated:

Solapur News: मुले आणि सुनांनी आईवडिलांना हीन दर्जाची वागणूक दिली, अपमानित केले आणि घरातून हुसकावून लावले.

पोटाला चिमटा घेऊन लेकांना मोठं केलं, लग्नानंतर त्यांनीच घराबाहेर काढलं, आईवडिलांनी असा शिकवला धडा
पोटाला चिमटा घेऊन लेकांना मोठं केलं, लग्नानंतर त्यांनीच घराबाहेर काढलं, आईवडिलांनी असा शिकवला धडा

सोलापूर: ज्यांनी नवं आयुष्य दिलं, शिकवलं आणि मोठं केलं, तेच आई-वडील वृद्ध झाल्यावर काहींना ओझं वाटू लागतात. त्यांना घराबाहेर काढलं जातं किंवा वृद्धाश्रमात सोडलं जातं. असे प्रकार आपल्या आवतीभोवती देखील घडले असतील. पण सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याच पोटच्या दोन मुले आणि सुनांनी वृद्ध माता-पित्याला वाऱ्यावर सोडलं. सततच्या त्रासाला कंटाळून वृद्ध दाम्पत्यानं थेट फौजदार चावडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण, पालनपोषण व देखभाल अधिनियम 2007 चे कलम 24 अन्वये दोन मुले आणि सुनांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोलापूर पोलिस प्रशासनाने या कौटुंबिक छळाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

​काय आहे नेमकी घटना?

​मुरारजी पेठेतील जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला नंदा रमेश शिंदे यांनी याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सन 2015 पासून नंदा शिंदे आणि त्यांच्या पतीचा त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी कोणताही सांभाळ केला नाही.​ वृद्ध माता-पित्यांच्या राहण्याची, जेवणाची अथवा आरोग्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांना वारंवार शिवीगाळ व अपमानित करून घराबाहेर काढण्यात आले होते.

​10 जुलै रोजी पुन्हा दिला हुसकावून

​गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या त्रासादरम्यान, 10 जुलै रोजी फिर्यादी वृद्ध महिला आपल्या स्वतःच्या घरी गेल्या होत्या. मात्र, तिथे गेल्यावर दोन्ही मुले आणि सुनांनी त्यांना पुन्हा एकदा अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली, अपमानित केले आणि घरातून हुसकावून लावले. मुलांच्या या टोकाच्या अन्यायाला आणि छळाला कंटाळून अखेर पीडित वृद्ध महिलेने पोलिसात धाव घेतली.

तक्रारीचे गांभीर्य आणि वृद्ध माता-

पित्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन फौजदार चावडी पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी अतुल रमेश शिंदे (मुलगा), अनुप रमेश शिंदे (मुलगा), सुवर्णा अतुल शिंदे (सून), दीपाली अनुप शिंदे (सून) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *