Pune Crime News: पाठीमागून भिंत फोडली, दुकानात शिरले अन्… तब्बल ३० तोळं सोनं, सव्वा किलो चांदी लुटली, पुण्यात रखवालदाराला दिलेल्या खोलीतूनच झालं कांड


पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका सराफी पेढीतून चोरट्यांनी अत्यंत (Pune Crime News) नियोजनबद्ध पद्धतीने धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी शेजारील खोलीतून दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून तब्बल ३५ तोळे सोने आणि सव्वा किलो चांदी चोरून नेली. या धाडसी चोरीमुळे (Pune Crime News) पुणे आणि हडपसर परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी घबराट पसरली (Pune Crime News) आहे. ही घटना रविवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास मुंढवा रस्ता, म्हसोबावस्ती येथील ‘आराध्या ज्वेलर्स’मध्ये घडली. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी आधी सराफी दुकानाच्या लगत असलेली खोली गाठली. त्यानंतर त्या खोलीतून दुकानाच्या पाठीमागील भिंतीला मोठे भगदाड पाडले आणि थेट सराफा दुकानात प्रवेश केला. दुकानातील लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅसकटरचा वापर केला होता. गॅसकटरच्या साहाय्याने लॉकर तोडून त्यांनी दुकानातील ३५ तोळे सोने आणि सव्वा किलो चांदीचे दागिने चोरले व तेथून पसार झाले. पोलिसांना घटनास्थळी चोरीसाठी वापरलेले एक गॅसकटर मिळून आले आहे. हा संपूर्ण चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी जेव्हा दुकान मालकाने दुकान उघडले, तेव्हा उघडकीस आला.(Pune Crime News)

Pune Crime News: नेपाळी रखवालदार फरार; पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही

या गुन्ह्यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सोसायटीचे रखवालदारच संशयाच्या भोऱ्यात आहेत. दोन महिन्यांपूर्वीच संबंधित सोसायटीने एका नेपाळी रखवालदाराला कामावर ठेवले होते. त्याची राहण्याची खोली नेमकी या सराफी दुकानाच्या मागेच होती; आणि याच खोलीतून भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्यात आली आहे.

सध्या हा रखवालदार फरार असून धक्कादायक म्हणजे सोसायटीकडे त्याचे आधार कार्ड किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. मूळचा पहिला रखवालदार काही दिवसांपूर्वी गावाला गेला होता, त्यानेच जाण्यापूर्वी या दुसऱ्या रखवालदाराची सोय केली होती. सध्या हे दोन्ही रखवालदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Pune Crime News: तपासासाठी पथके रवाना; सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट

चोरीची माहिती मिळताच हडपसर आणि मांजरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. कॅमेऱ्यात काही चोरटे कैद झाले आहेत, मात्र त्यांनी आपले चेहरे झाकलेले असल्यामुळे आणि फुटेज अस्पष्ट असल्यामुळे चोरट्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक ठरत आहे. चोरीला गेलेल्या मालाची अचूक किंमत आणि वजनाची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Crime News: पुण्यात यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना

पुण्यात भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत:

वारजे (२०२२): लक्ष्मीमाथा परिसरातील एका सराफ पेढीच्या शेजारी मसाला विक्रीचे दुकान सुरू करायचे आहे, असे सांगून चोरट्यांनी गाळा भाड्याने घेतला होता. त्यानंतर रात्रीच्या वेळी भिंतीला भगदाड पाडून त्यांनी तब्बल किलोमध्ये सोने चोरले होते.

समर्थ पोलीस ठाणे हद्द: सोमवार पेठेतील एका मोबाईल शॉपीच्या भिंतीला ड्रिल मशीनने भगदाड पाडून चोरट्यांनी ५२ लाख ३० हजार रुपये किमतीचे ३०७ मोबाईल चोरून नेले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना आणि व्यापारी संघटनांना आपल्याकडे कामावर ठेवणाऱ्या सुरक्षारक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती, पोलीस पडताळणी (Police Verification) करूनच कामावर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *