IND vs ENG 1st ODI Playing XI : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पावसामुळे पहिला सामना रद्द झाला, तर त्यानंतर सलग चार सामने गमावत भारताने मालिका 0-4 ने गमावली. आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत असून, एजबेस्टन येथे होणाऱ्या पहिल्या वनडेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टी-20 मालिकेतील अपयश विसरून टीम इंडिया वनडेत विजयी पुनरागमन करणार का? यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोणत्या 11 खेळाडूंवर विश्वास दाखवणार, याची मोठी उत्सुकता आहे.
अशी असू शकते भारताची प्लेइंग-11
गौतम गंभीर यांच्या रणनीतीनुसार भारत 8 क्रमांकापर्यंत फलंदाजीची खोली असलेला संघ मैदानात उतरवू शकतो. त्यामुळे फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंना अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे. सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी दिसू शकते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल फलंदाजीला येण्याची शक्यता आहे. मधल्या फळीत शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. या तिघांमुळे संघाला फलंदाजीसोबत गोलंदाजीचेही अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील. गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार यांच्यावर असू शकते.
गुरनूर ब्रार ठरू शकतात ‘X-Factor’
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत गुरनूर बरार यांनी तीन सामन्यांत 7 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली होती. त्यानंतर श्रीलंका अ विरुद्धच्या सामन्यातही त्यांनी तब्बल 10 विकेट्स घेत आपल्या फॉर्मची झलक दाखवली. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना धक्का देण्यासाठी गंभीर त्यांच्यावर मोठा डाव खेळू शकतात.
‘या’ चार खेळाडूंना बसावे लागू शकते बाहेर
पहिल्या वनडेसाठी संघ निवडताना काही खेळाडूंना बाकावर बसावे लागू शकते. त्यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, कुलदीप यादव आणि ईशान किशन यांचा समावेश असू शकतो. मात्र प्रसिद्ध कृष्णा हे अजूनही प्लेइंग 11 च्या शर्यतीत आहेत. जर त्याला संधी मिळाली, तर गुरनूर ब्रार यांना बाहेर बसावे लागू शकते. तरीही इंग्लंडला अनपेक्षित धक्का देण्यासाठी बरार हा गंभीर यांचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
टीम इंडियाची संभाव्य Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
इंग्लंडने Playing XI आधीच केली जाहीर
इंग्लंडने सामन्याच्या एक दिवस आधीच आपल्या अंतिम 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. जेकब बेथेल आणि बेन डकेट ही नवी सलामीची जोडी भारताविरुद्ध डावाची सुरुवात करणार आहे. उर्वरित बहुतांश खेळाडू टी-20 मालिकेत खेळलेलेच असून, याच संघाने भारताला एकही सामना जिंकू दिला नव्हता.
इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग आणि आदिल रशीद.
IND vs ENG ODI मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
14 जुलै 2026 : पहिला ODI, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (3:30 दुपारी)
16 जुलै 2026 : दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (5:30 संध्याकाळी)
19 जुलै 2026 : तिसरा एकदिवसीय, लॉर्ड्स, लंडन (3:30 संध्याकाळी)
हे ही वाचा –