Horoscope Today 25 June 2026: आजचा गुरूवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरूंच्या कृपेने विघ्न टळेल, भाग्योदय..आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 25 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 25 जून 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल, शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रथम तुम्हाला त्याग करावा लागेल 
 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या विचारांमधील गोंधळ चेहऱ्यावर दिसेल, त्यामुळे लोक संभ्रमात पडतील 
 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक स्थिती सुधारणांसाठी मध्यस्तांची मदत घ्यावी लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जोडीदाराची गैरसमजामुळे वाढ होण्याची शक्यता आहे, धंद्यामध्ये पार्टनरच्या मताशी सहमत होणार नाही 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परिस्थितीप्रमाणे नवीन विचारांचा पाठपुरावा झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल, तेवढा यश मिळण्याचा आलेख उंचावेल 
 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात आपल्या कामाची पद्धत बदलाल, गोड बोलण्यावर भर ठेवा 
 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक शक्ती देण्यासाठी गृह समर्थ आहे, तुम्ही स्वतः या गोष्टीचे चिंतन कराल, त्यातून भरीव काहीतरी निर्माण होऊन फायदे मिळतील 
 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कर्तृत्व बहरेल, सूचक स्वप्न पडतील, दुसऱ्यांना सहकार्याचा हात द्याल 
 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला ध्येयवादी बनतील, त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी तुमच्या बुद्धीचा प्रकाशच तुम्हाला वाट दाखवेल 
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विविध पर्याय नजरेसमोर येतील, संघर्षाला तोंड द्यावे लागेल 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक स्तरावर खच्चीकरण करणारे प्रसंग उद्भवतील, परंतु घाबरून न जाता मार्ग चालत राहणं तुमच्या हातात आहे 
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायासाठी एखादी मोठी गुंतवणूक करावी लागेल घरातील लोकांचे सहकार्य जरा उशिरा मिळेल.

हेही वाचा

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसू नये! तुमच्या राशीनुसार सौभाग्यासाठी कोणते रंग शुभ? धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व जाणून घ्या…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *