Ketan Agrawal Death: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती


Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा (Ketan Agrawal Case) पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 18 जून रोजी घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं. सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता. यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता असं सिया आणि तिच्या प्रियकराला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याने दोघांनी केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

केतनचा मृतदेह घरी आणताच काय घडलं?

पुण्यात लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू झाला. केतन अग्रवालचा सिया गोयलबरोबर विवाह होणार होता. परंतु प्रेमप्रकरणातून सियाने केतनला संपविले आहे. या प्रकरणी वडिल विशाल अग्रवाल यांनी सिया गोयलवर अनैतिक संबंधाचा आरोप केला आहे. तसेच केतनचा मृतदेह घेऊन पोलीस आले तेव्हा सियाची कुठलीही रिअॅक्शन नव्हती. तिला दु:ख झालेले नव्हते. हे आम्हाला खटकले होते. पण आम्ही लक्ष दिले नाही. सिया गोयल हिचे चेतन बाबूलाल चौधरीसोबत नोव्हेंबरपासून प्रेमसंबंध होते. त्यातून दोघांनी केतनची हत्या केली, असं केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले. 

नेमकं प्रकरण काय?

बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Murder : लोहगडवरचा तो त्याचा शेवटचा ट्रेक, प्री-वेडिंग शूट दरम्यान पासपोर्टची चोरी ते लोहगडावरून घातपात; होणाऱ्या पत्नीच्या भयानक कटाचा पोलिसांकडून पर्दाफाश!





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *