IND vs IRE : भारत-आयर्लंड T20 मॅच कुठे पाहता येणार, किती वाजता होणार टॉस? पाहा शेड्युल | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


हेड टू हेड रेकॉर्ड

आयर्लंडची टीम भारताविरुद्ध एकही मॅच जिंकू शकलेली नाही. 2009 साली दोन्ही टीममध्ये पहिला सामना झाला होता, तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही टीम टी-20 फॉरमॅटमध्ये 8 वेळा भिडल्या आहेत. यातल्या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.

भारत-आयर्लंड सीरिजचं शेड्युल

भारत आणि आयर्लंड यांच्यातले दोन्ही सामने बेलफास्टच्या स्टरनमेंट क्रिकेट ग्राऊंडवर होतील. पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जूनला होईल.

किती वाजता सुरू होणार सामना?

आयर्लंडच्या स्थानिक वेळेनुसार दोन्ही सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होतील, तर टॉस दुपारी 1 वाजता होईल. भारतीय वेळेनुसार दोन्ही मॅच 6 वाजता सुरू होतील, ज्याचा टॉस 5.30 वाजता होईल.

लाईव्ह मॅच कुठे पाहता येणार?

भारत-आयर्लंड यांच्यातल्या दोन्ही टी-20 मॅचचं लाईव्ह प्रसारण भारतामद्ये सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहता येईल. तर मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह ऍप आणि वेबसाईटवरून दिसेल.

भारताची टी-20 टीम

श्रेयस अय्यर (कर्णधार), अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, रवी बिष्णोई, प्रिन्स यादव, हर्षित राणा, सुर्यांश शेडगे

आयर्लंडची टी-20 टीम

लॉर्कन टकर (कर्णधार), जॉर्ज डॉकरेल, स्टीफन दोहनी, हॅरी टॅक्टर, गॅरेथ डेलानी, बेन कॅलिटज, टीम टॅक्टर, रॉस अडेर, मॅथ्यू हम्फ्रेस, गोविन होए, लियाम मॅकार्थी, रुबेन विल्सन, जय मुंद्रा, मॅथ्यू होलार्ड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *