Ketan Agarwal Death : प्लान A फेल, प्लान B मध्ये हत्या, सियाचा प्लान C सुद्धा होता तयार, महाबळेश्वरमध्येच…खतरनाक प्लान उघड – Marathi News | Ketan Agarwal Murder : Siya Goyals Chilling Lohagad Conspiracy Exposed Plan B Worked


सिया गोयलचे हादरवणारे प्लान्स

सध्या संपूर्ण देशात पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणाने सर्वच हादरून गेले आहेत. जिच्याशी लग्न होणार होतं, त्याच तरुणाने लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना होणाऱ्या नवऱ्याची हत्या केली आहे. त्यामुळे सर्वच हादरले आहेत. प्रियकराशी संगनमत करून लोहगडवर तिने केतन अग्रवालचा खून केल्याचं उघड झालं आहे. सिया गोयल असं या तरुणीचं नाव आहे. तिच्या बॉयफ्रेंडचं नाव चेतन चौधरी असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून केतनला मारण्यासाठी प्लान ए, प्लान बी आणि प्लान सी तयार केला होता. प्लान ए फेल गेला. प्लान बीमध्ये मात्र त्यांनी केतनला संपवलं. हा प्लान फेल गेला असता तर प्लान सी त्यांचा तयार होता, अशी माहिती पुढे आली आहे.

प्लान ए फेल…

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणाची माहिती दिली. केतन आणि सिया तीन वेळा लोहगडावर गेले होते. हत्येच्या चार दिवसापूर्वी म्हणजे 14 जून रोजी सिया केतनला घेऊन लोहगडावर गेली होती. हा सियाच्या प्लान ए चा भाग होता. केतनची हत्या करण्याचा तिचा हा पहिला प्रयत्न होता. तिने केतनला धक्का दिला. केतनने एका झाडाच्या फांदीला पकडल्याने तो वाचला. त्यानंतर आपलं बिंग फुटू नये म्हणून तिने साप साप म्हणत केतनला घट्ट मिठी मारली. साप आल्यामुळेच धक्का दिल्याचा तिने बनाव केला. केतनलाही वाटलं साप आला होता. त्यापासून वाचवण्यासाठी सियाने धक्का दिला, असं तो समजला, असं त्याचे वडील म्हणाले.

प्लान बी वेळी काय घडलं?

केतनच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. त्याच्या एक दिवस आधी तिने मित्रांकडून लोहगडावर बर्थडे सरप्राईज मिळणार असल्याचा बहाणा करून केतनला लोहगडावर चलायचा हट्ट धरला. त्यासाठी ती केतन सोबत भांडली. वाद घातला. त्यामुळे केतन तिच्यासोबत लोहगडावर गेला. यावेळी चेतन तिथेच होता. चेतन चौधरीने त्याचा मोबाईल कोंढवा येथील घरीच ठेवला होता. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून त्याने तसं केल्याचं सांगितलं जात आहे. त्याने आपली ओळख पटू नये म्हणून हुडी घातली होती. प्रचंड उकाड्याच्या सीजनमध्ये त्याने हुडी घातल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यामुळेच त्याच्यावर संशय बळावला होता. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून त्यातून या गोष्टी स्पष्ट झाल्याचं सांगितलं जातआहे.

लोहगडावर केतन मोबाईलवरून फोटो घेण्यात व्यस्त असतानाच सियाने त्याला धक्का दिला. त्यामुळे तो दरीत कोसळला. त्यानंतर सियाने पोलिसांना फोन करून केतन पाय घसरून दरीत कोसळल्याचं सांगितलं. दरीत कोसळल्याने केतनचा मृत्यू झाला. सियाचा प्लान बी यशस्वी झाला होता.

प्लान सी तयारच होता…

केतनच्या वडिलांच्या दाव्यानुसार, सियाने केतनला मारण्याचा फुलप्रुफ प्लान तयार केला होता. लोहगडावरी प्लान बीफेल झाला असता तर सियाने महाबळेश्वरमध्ये केतनची हत्या केली असती. महाबळेश्वरमध्ये केतनची हत्या करण्याचा सियाचा प्लान सी तयार होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *