Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ताथवडे येथील जीजी इंटरनॅशनल स्कूल मागे एकाच घरात एक महिला आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. महिलेने जेवनात विष कालवत स्वतःच्या मुलांचा खून केला आणि स्वतः आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे.
आर्थिक विवंचनेतून महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक विवंचनेतून महिलेने स्वतःच्या मुलांचा खून करून आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल उचलला असावा असा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. कल्पना बिपिन सूर्यवंशी वय 35 वर्ष, शुभश्री बीपीन सूर्यवंशी वय 17 आणि दादू बीपीन सूर्यवंशी वय 10 वर्ष असा मृत्यू झालेल्या तिघांचं नाव आहे या प्रकरणात तिघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी वाय सी एम हॉस्पिटल येथे पाठवले असून या प्रकरणात सध्या वाकड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
धक्कादायक! मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये युवकाची हत्या
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या धक्कादायक हल्ल्यात 21 वर्षीय मयंक लोहार याची निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मयंकचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार प्रचंड सदम्यात असून, विरारच्या सुराम पार्क परिसरात शोककळा पसरली आहे. मयत मयंक लोहार याच्या आयुष्याची अजून सुरुवातही नीट झाली नसताना मयंक चा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलाला न्याय मिळावा, यासाठी कुटुंबीयांनी आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहे. मयंक हा अंधेरीच्या कपड्याच्या दुकानात सेल्स मॅनेजर पदावर होता. कुटुंबात तीन भाऊ आणि एक बहिण आई वडिल असे विरारच्या सुराम पार्क येथील अमरनाथ बिल्डींग मध्ये रहातो. ते मुळचे उत्तराखंडचे आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकलमध्ये उपस्थित काही प्रवाशांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता किंवा तत्काळ मदत मिळाली असती, तर मयंकचा जीव वाचू शकला असता, अशी भावना नातेवाईक आणि त्यांच्या मिञ परिवारांकडून व्यक्त केली जात आहे. या हत्याकांडामुळे मुंबई लोकलमधील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मृत मयंकला श्रद्धांजली अर्पण करताना परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!