Last Updated:
ट्रेनसमोर हत्तींच्या कळपाला पाहून मोटरमन जीवांच्या आकांताने ट्रेन थांबवतो. पण पुढे जे घडतं ते खूपच भयानक आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Video News : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भरधाव ट्रेनसमोर अचानक हत्तींचा कळप समोर येतो. यावेळी ट्रेनसमोर हत्तींच्या कळपाला पाहून मोटरमन जीवांच्या आकांताने ट्रेन थांबवतो. पण पुढे जे घडतं ते खूपच भयानक आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भरधाव ट्रेनच्या लाईटच्या प्रकाशात रेल्वे ट्रॅक दिसत आहे. या ट्रॅकवर हत्तींचा कळप चढताना दिसतोय. या कळपामध्ये लहान मोठे सगळेच हत्ती दिसत आहे.सुदैवान भरधाव ट्रेन चालवताना मोटरमनला हे हत्ती दिसल्यामुळे मोठा अनर्थ ठरला होता. जर मोटरमनला हे हत्ती दिसले नसते तर मोठा अपघात झाला होता. जामध्ये हत्तींनाही जिवीतहानी झाली असती आणि ट्रेनेचेही मोठे नुकसान झाले असते. पण सुदैवाने मोटरमनमुळे मोठी दुर्घटना टळली.
रेल्वेच्या ट्रॅकवर आला हत्तीचा कळप, व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/TfqVUfNxoI
— VIRALबाबा (@viralmedia70) June 24, 2026
दरम्यान वेळेत गाडीला ब्रेक लावल्यानंतर ट्रेनच्या लाईटच्या प्रकाशात सर्व हत्ती रेल्वे रुळावर चढताना दिसत आहे. त्यातले काही हत्तींचा कळप हा रेल्वे रुळ ओलांडून निघून जातो. तर एक कळप तर सरळ ट्रॅकच्या मार्गाने चालू लागतात.त्यात काळा कुट्ट अंधार पडलेला असतो. अशा परिस्थितीत या हत्तींना रेल्वे रुळावरून पळवायच का असा प्रश्न मोटरमनला पडतो. तसेच दुसऱ्या ट्रॅकवरून रेल्वे येऊन अपघात होण्याचा धोका होता. पण व्हिडिओच्या शेवट पर्यंत हत्ती रुळावर चालताना दिसत आहे.
हा व्हिडिओ नेमका कुठला आहे,याची माहिती मिळू शकली नाही आहे.पण हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. अनेकांना या हत्तीसोबत कोणताही अपघात होऊ नये याचीच भीती वाटते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडींगला आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 24, 2026 11:51 PM IST
Viral Video: भरधाव ट्रेनसमोर जेव्हा हत्तींचा कळप येतो, मोटरमन जीवाच्या आकांताने ट्रेन थांबवतो, पण…पुढे काय घडतं?
