Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!


Girish Mahajan Fake Photo Viral : राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे एका मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता हे बनावट फोटो व्हायरल करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. आरोपीने कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून हे खोटे फोटो तयार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत संशयित आरोपी बालाजी म्हस्के याला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

Nashik Cyber Police Action : तपासात गुन्ह्याची कबुली, मोबाईल जप्त

काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र, राज्याच्या सायबर सेलने तांत्रिक तपासणीअंती हे फोटो बनावट असल्याची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान संशयित आरोपी बालाजी म्हस्के याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात वापरलेला सुमारे 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

Facebook Account Blocked : 6 हजार फॉलोअर्स असलेले फेसबुक खाते कायमचे बंद

संशयित आरोपीने बदनामीकारक मजकूर पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला होता. त्याचे फेसबुकवर सुमारे 6 हजार फॉलोअर्स होते. सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने आरोपीचे हे फेसबुक खाते कायमचे बंद (Terminate) केले आहे.

BNS Sections Invoked : पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356 (3), 66 (C), 67 तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलिसांचे तांत्रिक पथक आणि विविध अधिकाऱ्यांनी अत्यंत समन्वयाने कामगिरी बजावत आरोपीला जेरबंद केले आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *