Dhamaal 4 Box Office Collection Day 10: बॅालीवूडची अॅक्शन, अॅडव्हन्चर अन् कॅामेडी चित्रपट ‘धमाल 4’ने (Dhamaal 4) बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या टक्करला हॉलिवूड सिनेमा ‘द ओडिसी’ रिलीज झाला तरी, ‘धमाल 4’ या सिनेमाच्या केसालाही धक्का लागलेला नाही. या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार एन्ट्री केली आहे. दुसर्या शनिवारी जबरदस्त वेगाने दुहेरी आकडा गाठल्यानंतर, ‘धमाल 4’ ने दुसऱ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. या सिनेमाने रविवारी किती कोटींचा आकडा गाठला? पाहूयात.
‘धमाल 4’या सिनेमाने दुसऱ्या शनिवारी किती कोटींचं कलेक्शन केलं? (Ajay Devgans Dhamaal 4 Box Office Collection Day 10)
‘धमाल 4’ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात दमदार कामगिरी केली. ‘धमाल’ या सिनेमाच्या तिन्ही फ्रँचायझीने दमदार कमाई केली आहे. आता या सिनेमाच्या चौथ्या पार्टही जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 96 कोटींचे कलेक्शन केले आहे. आता या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. इतर सिनेमे रिलीज झाले असले तरी, या कॉमेडी सिनेमाच्या कमाईत फारसा फरक झालेला नाही.
रविवारी ‘धमाल 4’ने किती कोटी कमावले? (Dhamaal 4 Second Sunday Box Office Collection)
‘धमाल 4’ या सिनेमाने दुसऱ्या शुक्रवारी 5.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 9 व्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त बॉक्स ऑफिसवर आकडा गाठला. तब्बल 10.25 कोटींचे कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. यानंतर दुसऱ्या रविवारी म्हणजेच सुट्टीचा या सिनेमाला विशेष फायदा झाला. दुसऱ्या रविवारी या सिनेमाने 12.75 कोटींचे कलेक्शन केले. भारतात या सिनेमाने एकूण 10 दिवसांत 124.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.
दुसरा आठवडा असला तरी, ‘धमाल 4’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. 10 दिवसांत या सिनेमाने 124.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘धमाल 4’ हा सिनेमा 200 कोटी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. 75 कोटी रुपये कमावल्यानंतर हा सिनेमा आपला बजेट वसूल करु शकेल. तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा बजेट वसूल करु शकेल का? तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या: