Yogendra Yadav on CJP Protest नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा काढण्यात आला आहे. नीट यूजी परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 20 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांनी सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सीजेपीकडून अभिजित दिपकेच्या नेतृत्त्वात संसदेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत मोठ्या प्रमाणात तरुण आंदोलक जमले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होत एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत त्यांनी 50 वर्षानंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर आल्याचं म्हटलं.
योगेंद्र यादव काय म्हणाले?
आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहोत. या वेळी मी रायसीना रोडवर आहे. दिल्लीतील ल्यूटेन्स दिल्ली म्हटलं जातं, दिल्लीतील सत्ताकेंद्र जिथं आहेत, हा रस्ता तिकडे जातो. संसदेकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर युवक, विद्यार्थी, बेरोजगार सर्वजण आले आहेत. लाखो लोक देशातील विविध भागातून आले आहेत. मोर्चा थोडे लोक काढतात, मोर्चाची रॅली झाली, रॅलीचा रेला झाला, आता रेलाचं रुपांतर मेला मध्ये झालं आहे. चारी बाजूला युवक आहेत. अमेरिकेत ऑक्यूपाय वॉल स्ट्रीट झालं होतं, तसंच युवकांनी दिल्लीत युवकांनी, बरोजगारांनी दिल्लीच्या सत्ताकेंद्राला ऑक्यूपाय केलं आहेयुवर
50 वर्षानंतर शिक्षण बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर
पन्नास वर्षानंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर आलेत. युवकांनी पुन्हा सिद्ध केलं की संसदेचा मार्ग रस्त्यावरुन जातो. युवक स्वत:हून आले आहेत,कोणाच्या फोनशिवाय आले आहेत. हा असंतोष, ही ऊर्जा आता व्यवस्था बदलासाठी कामाला लागली पाहिजे. आता हा विषय एका व्यक्तीच्या राजीनाम्याचा विषय राहिलेला नाही. जी शिक्षण व्यवस्था शिक्षण देत नाही, आर्थिक यंत्रणा जी रोजगार देत नाही, राजकीय यंत्रणा जी उत्तरं देत नाही, त्यांना बदलण्याची गरज आहे, असं योगेंद्र यादव म्हणाले.
एक ऐतिहासिक घड़ी के गवाह बन रहे हैं।
आज संसद की ओर जाने वाली हर सड़क पर युवा हैं। पचास साल बाद उन्होंने फिर याद दिलाया है – संसद का रास्ता सड़क से होकर जाता है।#संसद_मार्च #DharmendraPradhanResign pic.twitter.com/8yxLHmsRWa
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) July 20, 2026
दरम्यान, सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांना अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेलं नाही. सीजेपीच्या मोर्चामुळं दिल्लीत संसद भवन परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसदेकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी भाजप नेते मंत्री जे.पी. नड्डा यांनी दोन तास बसवून ठेवलं आणि केवळ 10 मिनिटांचा वेळ दिला, असं म्हटलं.
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम