CJP Protest Dharmendra Pradhan Resignation नवी दिल्ली : नीट यूजी परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्यावरुन कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज संसदेवर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला देशभरातील युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचूक यांनी आजच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. केंद्र सरकारनं भारताच्या शिक्षण व्यवस्थेला जगात सर्वोत्तम करण्यासाठी जबाबदारी पाळू न शकणाऱ्यांच्या राजीनाम्यापासून सुरुवात करावी, अशी मागणी गीतांजली वांगचुक यांनी केली आहे.
Geetanjali Wangchuk : गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
दिल्लीत इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे. हे सरकार देशाल विश्वगुरु बनवू शकत नाही, असं गीतांजली वांगचुक म्हणाल्या, माझा कोणत्याही सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही, मला म्हणून सोनम वांगचूक यांना दुसऱ्या रुग्णालयात न्यायचं आहे, अशी भूमिका गीतांजली वांगचुक म्हणाल्या.
राजीनाम्यापासून सुरुवात करा
आमचा लढा भ्रष्ट सरकारी व्यवस्थेविरोधात आहे, हे सरकार लोकांच्या हिताचे नाही,आमच्या मागण्या त्याच आहेत. शिक्षण हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचा विषय असला पाहिजे. भारताची शिक्षण व्यवस्था जगात सर्वोत्तम होण्यासाठी ठोस पावलं उचलली जावीत. त्याची सुरुवात जे त्यांची जबाबदारी योग्यपणे पाळू शकले नाहीत, त्यांच्या राजीनाम्यापासून सुरुवात केली पाहिजे, अशी मागणी गीतांजली वांगचुक यांनी केली आहे.
आम्ही देशाच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि देशासाठी उभे राहिले आहोत. सोनम वांगचुक भारतासाठी उभे आहेत. आम्ही युवकांसाठी त्यांच्या भविष्यासाठी उभे आहोत, असं गीतांजली वांगचुक यांनी म्हटलं आहे.
सौरभ दास काय म्हणाले?
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी संसद भवनावरील मोर्चा सुरु असल्याचं सांगितलं. शांततेच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जातंय, असं सौरभ दास यांनी म्हटलं.
जंतरमंतर ते संसद भवन असा मोर्चा सीजेपीकडून 20 जुलै म्हणजे आज काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सीजेपीच्या मोर्चात देशभरातील युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आंदोलक संसद भवनाच्या गेटपर्यंत पोहोचले होते. मात्र, सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव वाढलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम