Aamir Khan Wedding : निकाह की सप्तपदी.. आमिर खान- गौरी स्प्रॅटचं कसं होणार लग्न ? – Marathi News | ActorAamir Khan’s Third Marriage with Gauri Spratt Nikah or Hindu Wedding know how they will get married


मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळकला जाणारा बॉलिवूड अभिनेताआमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय , पण त्याच्या कामामुळे किंवा चित्रपटांमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे. येत्या रविवारी, 5 जुलै रोजी आमिर खान हा तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. आमिर आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हे विवाहबंधनात अचकणार असून खुद्द आमिरनेच या बातमीची पुष्टी केली. 5 जुलैला आम्ही लग्न करणार आहोत, असं आमिरने सांगितलं. मात्र आमिर खान हा गौरीशी निकाह करणार की हिंदू चालीरितींप्रमाणे सप्तपदी घेऊन त्यांचं लग्न पार पडणार आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या दोघांच्या लग्नात कोण-कोण पाहुणे येणार, बॉलिवूडमधले कोणते कलाकार त्यांना शुभेच्छा द्यायला उपस्थित राहणार ? तसेच त्याच्या पहिल्या दोन पत्नी आणि मुलंही या सोहळ्याला उपस्थित राहणार का हे जाणून घेण्याची उत्सुकता आमिरच्या चाहत्यांना आहे.

आमिर-गौरीचा निकाह की सप्तपदी ?

माध्यमांशी बोलताना खुद्द आमीर खानने गौरी स्प्रॅटसोबत होणाऱ्या लग्नाचं स्वरूप स्पष्ट केलं. आमिर ना ‘निकाह’ करणार, ना तो गौरीशी हिंदू चालीरितींप्रमाणे सप्तपदी घेऊन लग्न करणार आहे; त्याऐवजी, हे जोडपं आमीर खानच्या घरी ‘रजिस्टर मॅरेज’ (नोंदणीकृत विवाह) करून विवाहबंधनात अडकणार आहे. ” आमचं लग्न 5 जुलैला आहे. आम्ही घरीच लग्न करणार आहोत. हा सोहळा अत्यंत खाजगी असून, जवळच्या लोकांच्या उपस्थितीत तो पार पडणार आहे. आमच्या आनंदासाठी आम्हाला केवळ सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आम्ही आमच्या पुढील सुंदर प्रवासासाठी प्रार्थना करतो. हा पूर्णपणे खाजगी आणि घरीच पार पडणारा समारंभ आहे.” असं माध्यमांशी बोलताना आमीर म्हणाला.

काय म्हणाला आमिर, पहा व्हिडीओ

कोण कोण येणार पाहुणे ?

अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाला केवळ त्यांचं कुटुंबीय आणि काही जवळचे मित्रच उपस्थित राहणार आहेत. या लग्नासाठी अभिनेत्याने चित्रपटसृष्टीतील कोणाला आमंत्रित केले आहे का, याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

त्याच्या लग्नात त्याची मुलं उपस्थित राहणार असल्याचं खुद्द आमिरनेच सांगितलं होतं. मात्र रीना दत्ता आणि किरण राव, या त्याच्या एक्स-वाइफ या लग्नाला येणार आहेत की नाहीत, त्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

आमिर खानचं तिसरं लग्न

अभिनेता आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे, तो त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅटशी विवाहबंधनात अडकणार आहे. यापूर्वी त्याची दोन लग्न झाली होती. 1986 साली आमिरने रीना दत्ता हिच्याशी लग्न केलं होते. त्यांना जुनैद खान आणि आयरा खान अशी ही दोन मुलं आहेत. मात्र, २००२ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर खानने किरण राव हिच्याशी लग्न केले आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे, परंतु त्यांचे हे लग्न 2021 साली मध्ये संपुष्टात आले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *