Maharashtra Rain Weather Updates: पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः मुंबईतील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, अवघ्या 24 तासांत 200 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पुढील 72 तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज आहे.
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत असून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आकाश ढगाळ आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील काही तासांतही मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याचदरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होईल. मात्र त्यानंतर पाऊसाचा जोर कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. (Maharashtra Rain Weather Marathi News)
6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल- (Maharashtra Weather Updates)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे. घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची परिस्थिती सध्या चांगली आहे. 6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल. राज्यात इतर भागात पावसाची तीव्रता कमी आहे, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली.
राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद- (Satara Mahabaleshwar Rain News)
राज्यात सर्वदूर पाऊस आहे, मात्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा आहे. आगामी तीन ते चार दिवस मुंबईत पावसाची स्थिती आहे आणि तशीच राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे, असंही एस.डी. सानप म्हणाले.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुण्याला उद्या रेड अलर्ट- (Palghar Thane Raigad Pune Rain Marathi News)
मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबईमध्ये दोन ते तीन दिवस पाऊस कोसळत राहणार आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई रायगड, पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यात तसेच सातारा या भागात रेड अलर्ट असणार आहे.
मुंबईसह उपनगरांना उद्या रेड अलर्ट- (Mumbai Rain Updates)
मुंबईत सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार, ४ जुलैसाठी मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या ताज्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. हा इशारा ‘Very Likely’ म्हणजेच अत्यंत शक्य असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला असून, पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सखल भाग, समुद्रकिनारा आणि झाडांच्या परिसरात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातमी:
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग