Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: सतत चर्चेत असणारा प्रसिद्ध कॉमेडीयन समय रैना (Samay Raina) त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ (India’s Got Latent) या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनसह परतलाय. या शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि शर्वरी वाघ (Sharvari Wagh) या दोघीही गेस्ट म्हणून उपस्थित होत्या, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. आता, यावरून कॉमेडीयन सुनील पाल (Comedian Sunil Pal) यांनी समय रैना आणि आलिया भट्ट या दोघांवरही निशाणा साधला आहे.
एका व्हायरल व्हिडीओमध्ये, जेव्हा पापाराझींनी सुनील पाल (Sunil Pal) यांना विचारलं की, आलिया भटसारख्या मोठ्या स्टार्सनी अशा शोमध्ये का जावं? जिथे शिवराळ भाषेचा वापर केला जातो, तेव्हा त्यांनी जळजळीत आणि शायराना अंदाजात टिका केली. हसत-हसत ते म्हणाले की, “जहां-जहां हैं आलिया, वहां-वहां हैं गालियां! बजाओ तालियां, वरना सपने में आएगा विजय माल्या…” सुनील पाल यांचं वक्तव्य आलिया भटच्या उपस्थितीवर आणि शिवराळ भाषेचा वापर असलेल्या शोमध्ये जाण्यासंदर्भात करण्यात आलेली टीका होती.
समय रैनानं सुनील पाल यांना दिलेली 25 लाखांची ऑफर? (Samay Raina 25 Lakh Offer To Sunil Pal?)
कॉमेडियन सुनील पाल यांनी पॅपाराझींशी बोलताना एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासाही केलाय. सुनील पाल म्हणाले की, “समयनं मला 25 लाख रुपयांची ऑफरही दिली होती. पण, मी त्याला स्पष्टच सांगितलं की, मी शिव्या देणार नाही. तेव्हा तो मला म्हणाला की, तुम्ही देऊ नका… पण, आम्ही देऊ…” त्यानंतर सुनील पाल यांना विचारलं की, आलिया आणि शर्वरीनंही शिव्या दिल्या नाहीत. तेव्हा सुनील पाल म्हणाले, “जहां जहां आलिया, वहां वहां है गालिया…बजा दो तालियां, वरना सपने में आएगा विजय माल्या”.
समय रैनाबद्दल बोलताना सुनील पाल यांनी एक भुवया उंचावणारा दावा केलाय. ते म्हणाले की, “समय रैनाचे सुमारे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तो स्वतः मला फॉलो करतो. यावरून हे दिसून येतंय की, तो योग्य व्यक्तीला फॉलो करतोय आणि नक्कीच आपलं ध्येय गाठेल…” सुनील पाल यांनी पुढे सांगितलं की, समय रैनानं यापूर्वी त्यांना आपल्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली होती आणि त्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफरही दिली होती.
सुनील पाल यांनी समय रैनासमोर ठेवलेली अट (Sunil Pal Condition To Samay Raina)
सुनील पाल यांनी सांगितलं की, समय रैना यांच्या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी एक अट घातली होती. त्यांनी समय रैनाला सांगितलेलं की, “मी तुझ्या शोमध्ये नक्कीच येईन, पण एक अट आहे की, त्यात कोणतीही अश्लील भाषा किंवा शिवराळपणा वापरला जाणार नाही. तू मला मानधन दिलं नाहीस तरी चालेल, पण मी शिवराळ भाषेच्या वापराचं समर्थन करणार नाही…” सुनील पाल यांच्या मते, विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि शिवराळपणा सादर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, या आपल्या ठाम भूमिकेवर ते आजही ठाम आहेत.
कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त
सुनील पाल यांनी समय रैना यांच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ (India’s Got Latent) या शोबाबत चिंता व्यक्त करताना सांगितलं की, या शोमध्ये समाजाच्या हिताचे बदल व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. ते म्हणाले की, “समय रैना यांनी हा शो अशा प्रकारे घडवावा की, लोक तो आपल्या पालकांसोबत आणि घरातील ज्येष्ठ सदस्यांसोबत एकत्र बसून पाहू शकतील. शोचं स्वरूप असं असावं ज्यामुळे घरातील ज्येष्ठांचा आदर राखला जाईल आणि तेही तो शो पाहू शकतील…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :