Yogesh Rawat and Akanksha Chaudhary Lock Up 2: सध्या रिअॅलिटी शोमध्ये ‘लॉक अप 2’ (Lock up 2) या शोची प्रचंड चर्चा आहे. या शोमधील स्पर्धक एकमेकांबद्दलचे अनेक खुलासे करतात. अलिकडेच राम कपूर (Ram Kapoor) चर्चेत आला होता. त्याचा एका 25 वर्षीय इन्फ्ल्युएंसरला (Video Viral) जबरदस्ती कीस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या या शोमधील आणखी एका व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. Splitsvilla X6 चे एक्स कपल योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी यांची देखील या शोमध्ये एन्ट्री झाली आहे. शोच्या प्रीमिअर नाईटमध्ये त्यांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली होती. गेस्ट म्हणून आलेल्या उर्फी जावेदनं त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता.
आकांक्षा आणि योगेश या एक्स कपलचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Lock Upp 2 Yogesh Rawat Akanksha Chaudhary)
दरम्यान, ‘लॉक अप 2’ या रिअॅलिटी शोमध्ये आल्यानंतर हे एक्स कपल पुन्हा एकदा मित्र झाले आहेत. सांगायला ते फक्त मित्र आहेत, पण त्यांच्यातील लव्ह अँगल कुणापासूनही लपलेलं नाही. हे दोघेही ज्या पद्धतीने एकमेकांशी बोलतात, यातून त्यांच्यातील जवळीक दिसून येते. सध्या इंटरनेटवर त्यांची एक क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही आपला क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे.
या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. त्यानंतर आकांक्षाला काहीतरी सिक्रेट सांगण्यासाठी योगेश तिला ‘कंबल के अंदर आ’, असं म्हणताना दिसत आहे. आकांक्षा हे ऐकून शॉक्ड होते. ती हसते आणि लाजून असं करण्यास नाही म्हणते. योगेश शेवटी अंगावर ब्लँकेट घेतो. आकांक्षा देखील ब्लँकेटच्या आत जाते. योगेश इशाऱ्याने आकांक्षाला काहीतरी सांगत. दोघांमध्ये काहीतरी बोलणं होतं.
या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना त्यांच्यातील क्यूट केमिस्ट्री आवडली आहे. या शोमध्ये दोघेही एकमेकांशी भांडताना दिसतात. मात्र, थोड्या वेळानंतर दोघेही गोडी गुलाबीने राहतात. असं म्हटलं जातं दोघांच्या मनात एकमेकांसाठी लव्ह फिलिंग्स आहेत. या शोमध्ये राहून दोघांमधील प्रेम वाढत जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. Splitsvilla X6 मध्ये दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांनी पाहीली होती. दरम्यान, योगेशची एक्स गर्लफ्रेंड रुरु ठाकूरच्या एन्ट्रीनंतर आकांक्षासोबत असलेल्या नात्यात दरी निर्माण झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या: