Uddhav Thackeray on Ram Mandir: मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट रविवारी.. – Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray has made major announcement stating that protest in Mumbai on Ayodhya Ram Mandir Theft Case


उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी बंडखोरी झाली. ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहेत. यासोबत शिवसेना नेते सचिन आहिर यांनी मोठी बंडखोरी केला. त्यांना नुकताच विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी थेट आंदोलन करण्याची घोषणा केली. राम मंदिराच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यात उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत. दादरच्या हनुमान मंदिराच्या पुढे आंदोलनाला सुरूवात होणार आहे. रविवारी 5 तारखेला सायंकाळी 4 वाजवा आंदोलनाला सुरूवात होईल. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी लोकांना एकत्र येण्यासही सांगितले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भाजपच्या अंमला खाली देश आहे. भाजपच्या सत्तेचं मूळ हे राम मंदिर आहे. त्यात आम्ही आहोत. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं त्यात शिवसैनिक देशातील हिंदू सहभागी होता. तुमच्या माध्यमातून त्या काळातील दृश्य जनतेच्या मनात खोलवर रुजली आहे. गोध्रा, अहमदाबादमधील दंगल, मुंबईतील बॉम्बस्फोट. त्यात हिंदुंनी बरंच काही सोसलं होतं. त्याचं भांडवलं करून भाजपने या आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्यांचे दोन खासदार होते.

गांधी वादी समाजवाद त्यांचा होता. ते सोडून ते राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. आज देशात अमर्याद सत्ता भोगत आहे. आज राम मंदिर वेगळ्या गोष्टीने चर्चिला जात आहे. दरोडेखोरी सुरू आहे. आमदार खासदार फोडले जात आहे. त्याला ऑपरेशन नाव दिलं जात आहे. आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करत आहे का. या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील. पण चोरी होत आहे. राम मंदिरावर दरोडा टाकला जात आहे. काहींच्या मते हा चोरीचा पक्ष इतर पक्ष फोडण्यासाठी केला जात आहे.

90 च्या काळात वाजपेयी म्हणाले, अब हिंदू मार नही खायेगा. तसं मी म्हणतोय, अब हिंदू माफ नही करेगा. जे जे मंदिर लुटत आहे. भाजपचे कोणी असतील अन्य कोणी असतील त्यांना हिंदू माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. त्याची सुरुवात रविवारपासून करतोय. रविवारी संध्याकाळी 5 वाजता दादर कबुतरखान्याजवळ हनुमान आहे.

तिथे तमाम हिंदूंना ज्यांना ज्यांना वाटतं भाजपच्या कालखंडात हिंदुत्व धोक्यात आलं म्हणून मोर्चे काढले त्यांना आमंत्रण करतो. राम भक्त आणि हिंदूंनी यावं. ज्यांना मंदिरातील चोरी सहन होत नाही त्यांनी यावं. मी स्वत जाणार आहे. शिवसैनिक आणि नेते असतील. तमाम राम भक्त असतील. ज्यांनी हिंदुत्व सोडंल नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही. त्यांनी यावं. त्यांचं स्वागत करतोय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *