खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा ‘गद्दार’ डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका


धाराशिव : राज्यातील शिवसेना (shivsena) पक्षात झालेलं दुसरं सर्वात मोठं बंड म्हणजे ऑपरेशन टायगर, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फोडण्यात आले असून त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेशही झाला. उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेंकडून हा मोठा धक्का देण्यात आलाय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू करत संबंधित खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. धाराशिवमध्ये (Dharashiv) आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सभा घेतली. या सभेतून संजय राऊतांनी सर्वप्रथम खासदार ओमराजेंवर हल्लाबोला केला.  

उद्धव ठाकरे फिरत नाही म्हणतात उद्धव ठाकरे फिरायला लागले की काय होत ते महाराष्ट्र बघतोय. या सभा नाही, या माझ्या कौटुंबिक बैठका आहेत, यांनी कितीही आमदार फोडू दे, तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी राहणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी धाराशिवमधून फुटीर खासदारांवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकांवेळी, समोरच्यांकडून पैशांचा पाऊस पडत होता, तेव्हा या गद्दारासाठी एका शेतकऱ्याने त्याच्याकडचे पैसे निवडणुकीसाठी दिले. गद्दाराच्या सभेला मी आलो होतो तेंव्हा एक गरीब शेतकरी आला आणि म्हणाला, मला खासदारला पैसे द्यायचे आहेत. काय भाषण काय देत होता… माझा फोन नंबर घ्या म्हणायचा, मी फोन करायला लागलो तर फोन उचलायचा नाही. मग, मी कैलासला म्हणालो अरे हा तर फोन उचलत नाही, असा किस्सा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून सांगितला.  

याच एक भाषण होतं, त्या भाषणात तो म्हणाला, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ म्हटलं तर आपण कोणाचं नाव घेतो. आता, तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? आता तुझा गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी ओमराजेंना विचारला. यावेळी, ओमराजेंची नक्कल देखील त्यांनी केली होती. मी जेंव्हा याच्या प्रचारसाठी आलो होतो तेव्हा म्हणालो होतो दोन वाघ माझ्याकडे आहेत. मात्र, त्यातला हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, अशा शब्दात ओमराजेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 

ऑपरेशन देवेंद्र, पंतप्रधानपदासाठी सुरूय

या मिंदेसेनेला भवि्तव्य काय आहे? मग हे खासदार तिकडे का गेले? कारण भाजप मध्ये गटबाजी सुरू असून त्यांचं ऑपरेशन देवेंद्र सुरु आहे. काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुसऱ्या कोणाला दिली तर आश्चर्य वाटणार नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीचे स्वप्न पाहत आहेत, संघ सुद्धा पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देईल, मग माझं काय होईल यासाठी हे खासदार देवेंद्र फडणवीस यांना न देता बाजूला ठेवले. जेंव्हा पंतप्रधान कोण? यावेळी हे खासदार देवेंद्रला मत देणार नाहीत. 2029 पर्यत पंतप्रधानपदाचे जे चेहरे असतील त्यांचा पत्ता कट केला जाईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही – कैलास पाटील 

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आमदार कैलास पाटील यांनी भाषण करताना काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरेंची शब्द सोडणार नाही, काहीही झालं, काहीही वेळ आली तरी मी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, हे कैलास पाटलांनी सांगितलंय.

500 कोटींचे प्लॉट खरेदी, संजय राऊत कडाडले

धाराशिवमध्ये येताना जे दृश्य पाहिलं ते पाहता की उद्धव ठाकरे यांना बोललो, ऑपरेशन तुडवा सुरु झालाय. ऑपरेशन तुडवा धाराशिव मध्ये सक्सेसफुल होत आहे. हा खासदार गद्दार….भामटा आणि सोंगाड्या आहे, इतके सोंग याने केले आहेत, त्याची भाषण ऐका, असे म्हणत संजय राऊतांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बोचरी टीका केली. हा भामटा का गेला? कारण त्याने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. आता मला असेही वाटत आहे की, त्याच्या वडिलांचा जो खून झाला आहे, त्या खुनामागे देखील वेगळं काहीतरी रहस्य आहे. हा गेला कारण पवनराजे मल्टिस्टेट या त्याच्या कंपनीने 500 कोटींचे प्लॉट आख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले आहेत. त्याची ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. हा घाबरुन शिंदे गटात गेला आहे. वडिलांच्या नावाने स्थापने केलेल्या गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे. तेरणातील भंगार विकून त्याने पैसा खाल्ला असे अनेक गुन्हे केले म्हणू या सगळ्यांची चौकशी लागली. म्हणून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून गेल्याचे राऊतांनी म्हटले. 15, 20 वर्ष एका सापाला दूध पाजले होते. पण, आता त्याचा फणा ठेचायची वेळ आल्याचं संजय राऊतांनी म्हटलं.  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *