ENG vs NZ: बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती, म्हणाला… – Marathi News | England captain Ben Stokes announced his retirement while the third Test match against New Zealand was underway


ENG vs NZ: बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती, म्हणाला…Image Credit source: England Cricket Twitter

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालेल. इंग्लंडने दुसरा कसोटी सामना गमावला होता. या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्स आणि गस एटकिंसन हे दोघं खेळले नव्हते. मात्र तिसऱ्या सामन्यात त्यांचं कमबॅक झालं. पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर बेन स्टोक्सने नाइट कर्फ्यू मोडला होता. तसेच नाइट क्लबमध्ये वाद घातला होता. या वादामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटी सामन्यातून या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने या दोघांना परत बोलावलं. आता तिसरा कसोटी सामना सुरू असताना चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वी कर्णधार बेन स्टोक्सने निवृ्त्तीची घोषणा करून आश्चर्याचा धक्का दिला आहे.

इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच एक पोस्ट लिहिली असून त्यात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर लिहिलं की, ‘इंग्लंडच्या सर्वकालीन महान कर्णधारांपैकी एक असलेल्या बेन स्टोक्सने या कसोटी सामन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बेन, तू या संघाला लाभलेला सर्वात प्रेरणादायी कर्णधार, नेता आणि महान खेळाडू आहेस. आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा देतो.’

बेन स्टोक्स इंग्लंडसाठी 15 वर्षे खेळला असून 4 वर्ष कर्णधारपद भूषवलं आहे. इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी स्टोक्स होता. त्याने संघाला अनेक सामन्यात विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्टोक्सने 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाबाद 84 धावांची खेळी केली होती. त्याच वर्षी एशेजमध्ये हेडिंग्लेमध्ये नाबाद 135 धावा केल्या होत्या. तर 2016 मध्ये केपटाउनमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 258 धावांची खेळी केली होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *