Ben Stokes Retirement News : इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेला तिसरा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. स्टोक्सने या सामन्याच्या चौथ्या दिवशी ही मोठी घोषणा केली. त्याने रविवारी सकाळीच संघसहकारी आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) आपल्या या निर्णयाची कल्पना दिली होती. दरम्यान, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतच त्याने हा आपला शेवटचा सामना असू शकतो, असे संकेत दिले होते.
One of England’s all-time greatest captains, Ben Stokes, has decided to retire from international cricket at the end of this Test match.
Ben, you have been the most inspirational captain, leader and legend this team could have ever hoped for.
We love you so much and wish you… pic.twitter.com/U5grq0F0kj
— England Cricket (@englandcricket) June 28, 2026
15 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट
बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुमारे 15 वर्षांची राहिली. या काळात त्याने इंग्लंडसाठी अनेक संस्मरणीय आणि मॅच-विनिंग खेळी खेळल्या. आपल्या आक्रमक आणि धाडसी नेतृत्वाने त्याने इंग्लंडच्या कसोटी संघाला बॅझबॉल युगात एक नवी ओळख मिळवून दिली. गेली चार वर्षे तो इंग्लंडच्या कसोटी संघाचे यशस्वी नेतृत्व करत होता. त्याच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
Ben, for 𝗲𝘃𝗲𝗿𝘆𝘁𝗵𝗶𝗻𝗴 – thank you 🙏 pic.twitter.com/fld0wFJpxl
— England Cricket (@englandcricket) June 28, 2026
वाद ठरले निवृत्तीचे कारण?
स्टोक्स अलीकडेच एका मोठ्या वादात सापडला होता. लॉर्ड्स कसोटीतील विजयानंतर चेल्सी येथील एका नाईटक्लबमध्ये उशिरापर्यंत पार्टी केल्याप्रकरणी ईसीबी (ECB) आणि क्रिकेट रेगुलेटरने त्याची चौकशी सुरू केली होती. या वादामुळे त्याला द ओव्हल येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेरही राहावे लागले होते. चौकशीनंतर त्याला केवळ लेखी ताकीद देऊन सोडण्यात आले, मात्र या मानसिक ताणामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
इंग्लंड क्रिकेटमध्ये एका युगाचा अंत
बेन स्टोक्सची निवृत्ती हा इंग्लंड क्रिकेटसाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. आपल्या अष्टपैलू क्षमतेच्या आणि मॅच-विनिंग कामगिरीच्या जोरावर त्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. 2019 चा विश्वचषक आणि अॅशेस मालिकेतील हेडिंग्लेची ती ऐतिहासिक खेळी क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाहीत. आता स्टोक्सच्या जाण्याने इंग्लंडला एका नव्या आक्रमक कर्णधाराचा आणि प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूचा शोध घ्यावा लागणार आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला