Actress Married Former CM: प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल


Kannada Actress Triveni Rao: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय (Thalapathy Vijay) यांच्या अफेअरची (Affair) प्रचंड रंगली आहे.  दोघेही बऱ्याच ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. अलिकडेच त्रिशाने थलापती विजय यांच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यामुळे हे कपल लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे त्रिशा आणि विजय यांच्या अफेअरची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री त्रिवेणी राव हिनं माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांच्याशी लग्नगाठ बांधलीये. सध्या अभिनेत्रीच्या लग्नातील फोटोस सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

‘तगारु’ सिनेमातील कॉन्स्टेबल सरोजा या भूमिकेसाठी ओळखली जाणारी कन्नड अभिनेत्री  त्रिवेणी राव आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने 19 जून रोजी  त्रिपुरातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार  बिप्लब कुमार देब यांच्याशी लग्नगाठ बांधलीये.  54 व्या वर्षी बिप्लब देब यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न नेमकं कुठे झालं? दोघांची भेट नेमकी कुठे आणि कधी झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी त्यांचं लग्न पार पडलं असून, आगरतळा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिप्लब देब यांचं पहिलं लग्न नीति देब यांच्याशी  झाले होते. 2001 साली त्यांनी विवाह केला होता. लग्नाच्या 25 वर्षांनंतर 2025 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  घटस्फोटानंतर बिप्लब देब यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीवर बारकाईने लक्ष देण्याचे ठरवले.  वृत्तानुसार, घटस्फोटानंतर त्यांच्या कुटुंबाने विशेषत: त्यांच्या आईने दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला होता.  मात्र, त्यांनी राजकीय कारकि‍र्दीवर लक्ष केंद्रित केले. दरम्यान, त्यांनी नुकतंच लग्नगाठ बांधली. 

त्रिवेणी रावबद्दल थोडक्यात माहिती (Kannada actress Triveni Rao has tied the knot with former Tripura CM)

त्रिवेणी राव ही कन्नड अभिनेत्री असून,  तिला दर्शन स्टारर ‘तंगारु’ (2018) या सिनेमातून ओळख मिळाली. या सिनेमात त्रिवेणी राव हिनं कॉन्स्टेबल सरोजा ही व्यक्तीरेखा साकारली होती.   यानंतर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीने आपल्या कारकि‍र्दीत, ‘युवरत्ना’, ‘बाबू मार्ले’ आणि ‘राजा मार्तंडा’ या सारख्या सिनेमांमध्ये तिनं काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *