Hollywood Film Obsession: 10 कोटींहूनही कमी बजेट, या फिल्मनं जगभरात कमावले 3,360 कोटी; 26 वर्षांच्या युट्यूबरनं लावलं सगळ्यांनाच वेड


Hollywood Movie Obsession: गेल्या महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने सध्या जगभरातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. दहा कोटींहूनही कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात या चित्रपटाने 3360 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतातही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक अक्षरशः गर्दी करताना दिसतात.भारतात या चित्रपटाने 81.97 कोटी रुपये कमावले आहेत. यावरून या चित्रपटाच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका 26 वर्षांच्या यूट्यूबरने हा सिनेमा बनवलाय. जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाची प्रशंसा होत आहे.या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट आहे. कॅरी बार्करच्या ऑक्सेशन चित्रपटाविषयी आज आपण बोलतोय.या चित्रपटाने हॉरर चित्रपटांचा प्रचलित ट्रेंड मोडून काढलाय. 

काय आहे चित्रपटाची कथा? 

सध्या चर्चेत असलेल्या ऑब्सेशन या हॉलीवुड चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. या चित्रपटाची कथा बेअर या तरुणा भोवती फिरते. हा तरुण एका म्युझिक स्टोअर मध्ये काम करत असतो.त्यात स्टोअर मध्ये काम करणाऱ्या निकीवर त्याचा एकतर्फी प्रेम असतं.मात्र त्याचा अबोल आणि कसलाही आत्मविश्वास नसलेला स्वभाव त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी अपयशी ठरत असतो.एक दिवस तो एक रहस्यमय वस्तू विकत घेतो, जी सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणारी असते. निराशेच्या भरात तो इच्छा व्यक्त करतो की निकीने त्याच्यावर जगातला कुणाही पेक्षा जास्त प्रेम करावं आणि या इच्छेनंतर सगळंच बदलून जातं. या चित्रपटात इतके धक्कादायक ट्विस्ट येतात की, पाहणारा अक्षरशः हादरून जातो. प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या अतिरेकानं पाहणाऱ्याला अस्वस्थ करून टाकणारा हा चित्रपट हॉरर जॉनर मधला असला तरी कुठल्याही काल्पनिक भुताचा किंवा राक्षस, कुठल्यातरी अनामिक शक्तीचा आधार घेत नाही. हा एक सायको थ्रिलर आहे. 

26 वर्षांच्या यूट्यूबरने सगळ्यांनाच वेड लावलं

दिग्दर्शक कॅरी बार्कर या 26 वर्षांच्या यूट्यूबरने हा सिनेमा दहा कोटींपेक्षाही कमी बजेटमध्ये बनवला आहे.कुठलेही भव्य सेट्स किंवा खर्चिक दृश्यांवर अवलंबून न राहता केवळ दमदार लेखनाच्या जोरावर एखादा भयपट कसा उभा करता येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून या चित्रपटाला जगभरातील समीक्षक आणि प्रेक्षक पाहत आहेत. या चित्रपटातील प्रकाशयोजना म्युझिक आणि कॅमेरा चा वापर एवढ्या नेमकेपणाने केलाय की प्रेक्षक एका जागेवरून हलतही नाही.या चित्रपटातील लेखन ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे.प्रत्येक प्रसंगाचा कथेशी थेट संबंध नसला तरी कोणतीही घटनाही फक्त नाट्यमयता वाढवण्यासाठी घडत नाही.  

बॉक्स ऑफिस कलेक्शन

या चित्रपटाने जगभरात 3360 कोटींचं प्रचंड बॉक्स ऑफिस केलंय. हॉलीवुड ची कथा असली तरी भारतातही सिनेप्रेमींनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. केवळ भारतात या चित्रपटाने 81.97 कोटी रुपये कमावले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *