Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते’


Sangli Crime Vedant Bandgar Murder Case: सांगलीच्या मिरज तालुक्यातील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर (वय 14) याची रविवारी त्याच्या घरी डोक्यात गोळ्या झाडून हत्या (Murder news) करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना सांगलीचे खासदार विशाल पाटील (MP Vishal Patil) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सांगलीत (Sangli news) घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना वापरण्याचा एक पॅटर्न  आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घेण्यासाठी उद्युक्त करणारी पोलिसांची एक टोळी सांगलीत कार्यरत आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलांचा वापर करण्याच्या  रॅकेटमधून पैशांचा बाजार मांडला आहे, असा आरोप सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला. (Sangli Crime news)

सांगलीतल्या वेदांत बंडगर या14 वर्षाच्या मुलाची डोळ्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनंतर सांगलीत संतापाची लाट उसळली होती. पोलिस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांनी पदभार घेतल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी आशा होती. पण, परिस्थिती बिकट होत चालल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सडकून टीका करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. जिल्ह्यातल्या न्याय व्यवस्थेबद्दल, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. याच्यावर कोणाचे लक्ष आहे का?. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून खुनाची मालिका सुरू आहे. पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. सांगलीत जे खून होतात त्यात एक पॅटर्न आहे. अल्पवयीन मुलांना पुढे केले जाते तो खुनाची कबुली देतो. अशा मुलांना आरोप स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी पोलिसांची टोळी कार्यरत आहे. पैशांचा बाजार या माध्यमातून सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.  विशाल पाटील पुढे म्हणाले, भ्रष्ट कारभार वरून खालपर्यंत सुरू आहे. पैसे घेऊन बदल्या होतात. कोट-कोट रुपये देऊन अधिकारी येतात. मग ते कायदा व सुव्यवस्था कसे राखतील? पोलिस ठाणी पूर्णपणे विकली गेली आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात वसुली करणारा कर्मचारी आहे. वेदांतचा खून झाला त्या दिवशी तिथल्या पोलीस निरीक्षक आणि उपाधीक्षकांना कोणी कोणी फोन केले हे जनतेपुढे आले पाहिजे. हा आरोपी लोकसभेला कोणाचे आणि कोणत्या पक्षाचे काम करत होता हे जगजाहीर आहे. मुख्यमंत्र्यांना या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. (Vedant Bandgar Murder Case)

Vedant Bandgar news: सांगलीतील वेदांत बंडगर खून प्रकरणातील आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी : पोलिसांकडून कसून तपास सुरु 
 
सांगलीतील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा 14 वर्षीय नातू वेदांत बंडगर याची डोळ्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला चार दिवसानंतर पोलिसांनी मैत्रिणी सोबत कर्नाटक बॉण्ड्री वरील एका लॉजवरून ताब्यात घेतले होते. आज स्थानिक गुन्हे अन्वेषण या पथकाने त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणी अटकेतील संख्या दोन वर गेले असून यातील गडदे याचे दोन साथीदार अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल गडदे यांनी कोठून आणले याबाबत पोलिस तपास करत आहेत.

आणखी वाचा

जुन्या वादातून माथाडी कामगार नेत्याच्या नाताला संपवलं, चार दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *