Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने फोडला घाम ! आजचे दर पाहून… 10 ग्रॅम सोनं… – Marathi News | Gold silver price today 16 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune jalgaon maharshtra


Gold Rate Today In India : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष निवळल्याने, युद्धसमाप्ती झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र याचे जागतिक बाजारावरही पजसाद उमटले असून सोन्याचे आण चांदीचे दर वाढल्याने अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतील. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना, दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे; त्याचबरोबर औद्योगिक मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने चांदीच्या दरांनाही चालना मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही धातूंचे भाव धाडकन वर गेले आहेत. सर्वप्रथम सोन्याचा विचार केला तर सलग दुसऱ्या दिवशी त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज 16 जून रोजी देखील सोनं महाग झालं आहे.

गेल्या दोन दिवसांत 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 2460 रुपयांची, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 2260 रुपयांची वाढ झाली आहे. त्यापूर्वी, म्हणजेच 14 जून रोजी दर स्थिर राहण्यापूर्वी सलग दोन दिवसांत 24-कॅरेट सोन्याचे दर 3440 रुपयांनी आणि 22-कॅरेट सोन्याचे दर 3150 रुपयांनी वाढले होते. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 10 रुपयांची वाढ झाली असून, 22-कॅरेट सोन्याचे दरही 10 रुपयांनी वाढले आहेत. चांदीचा विचार करायचा झाला तर, दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीचे भाव प्रति किलो 100 रुपयांनी वाढले आहेत.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

देशातील प्रमुख 10 शहरांतील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया…

चांदीची चमकही वाढली, दर कितीवर ?

चांदीच्या बाबतीत सांगायचं तर, दोन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली आहे. या दोन दिवसांत चांदीच्या प्रति किलो दरात 5100 रुपयांची वाढ झाली आहे. या स्थिर कालावधीपूर्वी, 12 जून रोजी एकाच दिवसात त्यात 10, 00 रुपयांची मोठी वाढ झाली होती. आज दिल्लीत प्रति किलो दरात 100 रुपयांची वाढ होऊन चांदीचा भाव 2.65,100 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकाता यांसारख्या इतर प्रमुख महानगरांमध्येही हाच दर कायम आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचा प्रति किलो दर 2, 80, 100 पये इतका असून, चार प्रमुख महानगरांच्या तुलनेत तेथे चांदी सर्वात महाग आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *