‘स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही…’; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले…


Sanchita Ugale TV Actress Mumbai Crime: टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले (TV Actress Sanchita Ugale) हिनं रविवारी 14 जून रोजी आपलं आयुष्य संपवलं. संचितानं राहत्या घरात साडीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेऊन स्वतःच स्वतःच्या आयुष्याचा दोर कापला. घरात कुणी नसताना संचितानं (Sanchita Ugale Suicide Case) टोकाचं पाऊल उचललं, तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत फारच उशीर झालेला. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून, आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, संचिता उगले (Sanchita Ugale) हिच्या आजोबांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “संचिता अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी होती. तिनं स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलेलं. तिच्या पाठीशी कोणीही गॉडफादर नव्हता. कामाचीही तिला कमतरता नव्हती आणि तिच्या आयुष्यात कोणताही मोठा वाद असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे तिनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हे आम्हालाही समजत नाही…”

या घटनेमुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून, तिच्या निधनानं चाहत्यांसह सहकलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. सध्या आचोळ पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 

“तिच्यात काहीच कमी नव्हती…” (Sanchita Ugale Rrandfather Reaction)

संचिता उगलेचे आजोबा पुढे बोलताना म्हणाले की, “तिची मनस्थिती किंवा त्या काळात ती कोणत्या परिस्थितीतून जात होती, किंवा नेमकी समस्या काय होती? याबद्दल सांगायचं तर… तिचा कोणाशीही वाद नव्हता आणि कोणीही तिच्याबद्दल कधी वाईट बोललेलं नाही. ती कशातच कमी नव्हती. तिनं केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण केलीय… ती खरोखरंच एक कर्तबगार तरुणी होती. तिनं संपूर्ण तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात मोठी ख्याती मिळवलेली…”

पूजा नावानं प्रसिद्ध होती संचिता उगले (Sanchita Ugale Was Known By Name Pooja)

संचिताच्या आजोबांनी पुढे बोलताना सांगितलं की, “तिच्या टीव्ही मालिका पाहणारे तिला पूजा म्हणून ओळखायचे. त्या भूमिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झालेली. संपूर्ण नजर जिल्ह्यात तिला लोक ‘पूजा’ याच नावानं हाक मारायचे. मी जेव्हा कधी तिथे जायचो, आणि ती माझी नात आहे असं सांगायचो, तेव्हा संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील नातेवाईक, ओळखीचे लोक तिला केवळ पूजा याच नावानं ओळखायचे. तिला ‘संचिता’ नावानं ओळखणारे क्वचितच होते. सर्वांनाच ती ‘पूजा’ म्हणूनच माहीत होती, जे नाव तिचं मालिकेत होतं. हे अत्यंत दुःखद आहे. तिनं असं का केलं? तिच्या मनात नक्की काय चाललं होतं? हे केवळ देवालाच ठाऊक… हे आमच्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचंय…”

महत्त्वाच्या इतर बातम्या :

TV Actress Sanchita Ugale End Life: विक्की कौशलच्या ‘छावा’मध्ये ताराराणी साकारलेल्या मराठी अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं; कारण समोर आलं, कुटुंबीयांनी सगळं सांगितलं

ABP Majha च्या बातम्या LIVE 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *