Weekly Horoscope 6 To 12 July 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (June 2026) महिना हा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे, आजपासून याच महिन्याचा एक नवा आठवडा सुरू होतोय. हा आठवडा 6 ते 12 जुलै असा आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, या काळात ग्रहांचे शुभ योग बनत आहेत. हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी जुलैचा हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता असून वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा लाभदायक करार मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात जोडीदाराशी चांगला संवाद राहील आणि गैरसमज दूर होतील.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात संयम आणि नियोजन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु कुटुंबासाठी काही अतिरिक्त खर्च होऊ शकतो. प्रेमसंबंधात भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी हा आठवडा भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक अडथळे सहज दूर होतील. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसायात नफा वाढेल आणि नवीन संपर्क लाभदायक ठरतील. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. प्रेमजीवन आनंदी राहील आणि अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासात चांगले यश मिळेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा घर, कुटुंब आणि करिअर यामध्ये समतोल राखावा लागेल. नोकरीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. व्यवसायात जुनी अडकलेली देणी वसूल होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, पण घरगुती खर्च वाढू शकतो. प्रेमसंबंधात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा आधार घ्या
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी यश, मान-सन्मान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होईल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. विवाहितांच्या जीवनात गोडवा वाढेल. प्रवासाचे योग असून ते लाभदायक ठरू शकतात. आरोग्य चांगले राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. कामात सातत्य ठेवल्यास वरिष्ठांचे कौतुक मिळेल. व्यवसायात स्पर्धा वाढेल, त्यामुळे सावधगिरी बाळगा. आर्थिकदृष्ट्या बचतीवर भर द्या. प्रेमसंबंधात लहानसहान वाद टाळा. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याच्या बाबतीत थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते.
हेही वाचा :
Lord Shiv: शिवलिंगासमोर भाविक 3 टाळ्या का वाजवतात? काय आहे यामागील महत्त्व, शास्त्र अन् फायदे? जाणून व्हाल थक्क…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)