Aamir Khan Gauri Spratt Marriage: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आमिर खान (Aamir Khan) यानं त्याची जोडीदार गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्याशी लग्न केलंय. लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर या जोडप्यानं पती-पत्नी म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केलीय. सुरुवातीच्या फोटोंनंतर, आता त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आलाय. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) यानं आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये हे जोडपं लग्नाचे विधी पार पाडताना आणि आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत डान्स करताना दिसत आहे. डान्स करता करताच, आमिर खान गौरी स्प्रॅटला मिठी मारतो आणि तिला सर्वांसमोरच किस करतो.
इरफान पठाण यानं व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय की, “प्रिय आमिर भाई आणि गौरी, तुमच्या लग्नाबद्दल तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन! तुमचं आयुष्य प्रेम, आनंद, हास्य आणि एकमेकांवरील प्रेमानं भरलेलं असावं, अशी मी कामना करतो. अल्लाह तुमच्या या सुंदर प्रवासाला अफाट आनंद आणि अगणित आशीर्वादांनी भरून देवो. मला तुम्हा दोघांबद्दल खूप आनंद होतोय. पुन्हा एकदा अभिनंदन!”

आमिर खानच्या लग्नाचा VIDEO (Aamir Khan Wedding Video)
आपल्या खास लग्नसोहळ्यासाठी आमिर खाननं ब्रॉन्ज ब्रोचसोबत एक साधा पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केलेला. गौरीनं सुंदर वर्क असलेला बेज रंगाचा ड्रेस वेअर केलेला आणि केसांची हेअरस्टाईल केलेली. आमिर खाननं पेपरवर सह्या केल्या आणि गौरीसोबत साताजन्माची गाठ बांधली. त्यानंतर त्यानं सर्वांसमोर गौरीला किस केलं.
आमिर खानच्या लग्नाचा पहिला फोटो (Aamir Khan Wedding First Photo)
आमिर खानच्या PR एजन्सीनं सोशल मीडियावर आपल्या नवविवाहित आयुष्याचा पहिला फोटो शेअर केला. आमिरनं फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “प्रेम, आनंद आणि अविस्मरणीय क्षणांचा सोहळा… या, आमिर खानच्या लग्नातील त्या खास क्षणांचा एक भाग व्हा, जे जवळीक, आनंद आणि एक संस्मरणीय उत्सवाच्या जादूनं भरलेले आहेत…”
![]()
आमिरच्या लग्नाला तिनही मुलं अन् जावयाची हजेरी
गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाला आमिर खानची तिनही मुलं आणि गौरीचा मुलगा उपस्थित होता. आमिर खानचं पहिलं लग्न फिल्म प्रोड्यूसर रीना दत्ता यांच्याशी झालेलं, दोघांनाही जुनैद आणि इरा खान ही दोन मुलं आहेत. तर, 2005 मध्ये दिग्दर्शिका किरण राव यांच्यासोबत आमिर खाननं दुसरं लग्न केलं आणि 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :