Mumbai Pune Expressway missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये लोणावळा (Lonavala) आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा कितीतरी पट अधिक पाऊस झाला आहे. अशातच मिसिंग लिंकच्या (Missing Link) एन्ट्री पॉईंटवर एक मोठा स्लॅब कोसळला आहे. हा स्लॅब कोसळून छताच्या भागातून डोंगरावरील राडारोडा खाली पडत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्णपणे बंद नसली तरी अतिश्य धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सोमवारी मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावाच, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईकडे जाताना उर्से टोल नाक्यावर सर्व वाहतूक रोखली. त्यामुळे प्रवाशांनी या मार्गावर येऊ नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर असणाऱ्या फूडमॉलमध्येही पावसाचे पाणी साचले आहे. खोपोली जवळील पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
(Mumbai Pune Expressway news)
यापूर्वी मिसिंग लिंकच्या रस्त्यावर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यावरुन बराच वादंग निर्माण झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादा रस्ता नवा बांधल्यानंतर सर्व गोष्टी सेटल होण्यासाठी वेळ लागतो, पहिल्या पावसात काही गोष्टींची चाचणी होते, त्यानंतर दुसरी लेयर टाकली जाते, असे स्पष्टीकरण दिले होते.
Pune News: प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
महत्त्वाची सूचना 🚨
सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई Connecting Link Road वरील पुणे ते मुंबई मार्गावरील Tunnel 2 च्या बाहेर दरड कोसळली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आज पहाटे ४ वाजल्यापासून वाहतूक वळविण्यात आली आहे.
महामार्ग वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने…
— MSRDCofficial (@MSRDC_official) July 6, 2026
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
मुंबई गोवा महामार्गावर आणखी एका ठिकाणी दरड रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे. परशुराम घाटाच्या जवळ असलेल्या ओमेगा हॉटेलच्या शेजारी डोंगरातील माती महामार्गावर यायला सुरुवात झाली आहे. डोंगराच्या वरच्या बाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
याशिवाय, रायगड जिल्ह्यात खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली गेला आहे. सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाताळगंगा आणि भोगावती नदीने धोका पातळीच्या वर वाहत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मिसिंग लिंकवर मोठी दुर्घटना, स्लॅब कोसळून छतातून पाणी अन् माती खाली कोसळली, भयानक व्हिडीओ#Mumbai #Pune #Rain #MissingLink pic.twitter.com/Ka9KidTVbC
— ABP माझा (@abpmajhatv) July 6, 2026
Heavy Rain Maval: मावळमध्ये घरावर दरड कोसळली
मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO), पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील ५व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे (१ अधिकारी, २ वरिष्ठ अधिकारी व २७ जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.
आणखी वाचा