Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या भाग्योदयाची वेळ! आजपासून नवा आठवडा सुरू, 4 राशींचं भाग्य फळफळलं, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 6 To 12 July 2026: नुकताच जुलै महिना सुरू झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा जुलै (June 2026) महिना हा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे, आजपासून याच महिन्याचा एक नवा आठवडा सुरू होतोय. हा आठवडा 6 ते 12 जुलै असा आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, या काळात ग्रहांचे शुभ योग बनत आहेत. हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.  

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवृद्धी करणारा ठरेल. नोकरीत नवीन संधी मिळतील आणि कामाचा वेग वाढेल. व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक लाभाचे चांगले संकेत असून अडकलेले पैसे मिळू शकतात. प्रेमजीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी या आठवड्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. प्रेमसंबंधात रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी भाग्याची चांगली साथ मिळेल. नोकरीत नवीन संधी आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील आणि प्रवासाचे योग लाभदायक ठरतील.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा करिअरमध्ये सातत्य आणि शिस्त यामुळे यश मिळेल. वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन योजना फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि बचत वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्य सामान्य राहील, मात्र गुडघे किंवा सांध्यांची काळजी घ्या.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा हा नवीन कल्पना आणि धाडसी निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात उत्पन्न वाढेल आणि नवीन ग्राहक जोडले जातील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रेमजीवनात आनंद आणि स्थिरता राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. कामात घाई न करता नियोजनपूर्वक पुढे जा. नोकरीत वरिष्ठांशी वाद टाळा. व्यवसायात मोठे निर्णय काही दिवस पुढे ढकललेले चांगले. आर्थिक स्थिती सामान्य राहील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधात विश्वास टिकवणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार आणि थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार लाभदायक ठरेल.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 3 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *