Video : तिसऱ्यांदा नवरदेव झालेल्या आमिर खानच्या पायत मोठे पैंजण, पाहताच चाहते म्हणाले, ‘कोणती परंपरा?’ – Marathi News | Aamir Khan complete his wedding look with an anklet shocked fans


Video : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान याने वायाच्या 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. 5 जून रोजी दोघांनी त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं. या साख प्रसंगी फक्त नवरी नाही तर, नवऱ्या मुलाची देखील चांगलीच चर्चा रंगली. आमिर खान कायम हटके लूकमध्ये सर्वांच्या समोर येतो. त्याच्या तिसऱ्या लग्नात देखील असंच काही झालं आहे. विशेषतः आमीर खानच्या पायातील पैंजणाने. एका व्हिडिओमध्ये आमीर एका पायात जाड आणि जड चांदीचे पैंजण घातलेला दिसला.

तिसऱ्या लग्नाच्या निमित्ताने आमीरने हस्तिदंती रंगाचा धोतर-कुर्ता घातला होता, ज्यावर एक सुंदर ब्रोच लावलेला होता. मात्र, त्याच्या लूकमधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि चर्चेचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे त्याच्या पायात घातलेले जाड चांदीचे पैंजण, जे धोतराच्या खालून स्पष्ट दिसत होते. सोशल मीडियावरील चाहत्यांचे याकडे त्वरित लक्ष गेलं आणि या वेगळ्या शैलीबद्दल बरीच चर्चा रंगली; अनेकांना प्रश्न पडला की ही एखाद्या विशिष्ट प्रथेचा किंवा परंपरेचा भाग आहे का?

गौरी हिनेही पारंपरिक लूक अतिशय सुंदररीत्या साकारला. तिने पेस्टेल शेडचा लेहंगा घातला होता आणि त्यासोबत नाजूक कटवर्क व पारदर्शक नेटच्या कापडापासून बनवलेला फुल-स्लीव्ह ब्लाउज घातलेला. तिने एका खांद्यावर ओढणी घेतली होती, केसांची एका बाजूला स्टाईल करून त्यात फुले माळली होती आणि लेअर्ड नेकलेस, चोकर व आकर्षक कानातले घालून लग्नासाठी आपला लूक पूर्ण केला होता.

लग्नादरम्यान, दोघांनी सर्वांच्या उपस्थितीत एकमेकांना वचने दिली आणि आपला पहिला डान्स सादर केला. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये आमिर गौरीला मिठी मारताना आणि तिला किस दिसत आहे.व्हिडीओ पोस्ट करत इरफान कॅप्शनमध्ये म्हणाला. त्यांचे आयुष्य प्रेम, आनंद आणि आशीर्वादांनी भरलेलं असावं अशी तो आशा करतो…

आमिर आणि गौरीच्या तिसऱ्या लग्नासाठी अभिनेत्याचे तिनही मुलं उपस्थित होते. आमिर याने पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबत केलं. दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत केलं. गौरी हिचं सुद्ध पूर्वी लग्न झालं असून तिला एक मुलगा देखील आहे. पण तिच्या पहिल्या नवऱ्याबद्दल कोणतीच माहिती समोर आली नाही,





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *