Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Gite Nashik: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election Result 2026) जाहीर झाला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नाशिक विधान परिषदेसाठी एकूण 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील 13 मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण 605 मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मते मिळवता आली. दुसऱ्या बाजूला, निवडणुकीच्या रिंगणात असलेले आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 303 चा कोटा पार केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. (Gokul Gite Nashik Vidhan Parishad Election Result 2026)
गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंनी तातडीने मुंबईत बोलावून घेतले- (Gokul Gite Vidhan Parishad Election 2026)
गोकुळ गीते यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलावून घेतले आहे. गोकुळ गीते यांना आज सायंकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान एकनाथ शिंदेंनी मुंबईत बोलावले आहे. तसेच गोकुळ गीते यांच्यासाठी एकनाथ शिंदे विमान देखील पाठवणार आहेत.
नाशिक अंतिम निकाल- (Nashik Vidhan Parishad Election Result 2026)
- नाशिक एकूण मतदान – 618
- अवैध मतदान – 13
- वैध मतदान – 605
- फायनल कोटा – 303
- अपक्ष, गोकुळ गीते – 357
- शिवसेना, नरेंद्र दराडे – 248
निकाल- गोकुळ गीते विजयी
विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांचा निकाल- (Vidhan Parishad Election Result 2026 Winner List)
- ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
- यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
- रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
- अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)
- छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
- नाशिक- गोकुळ गीते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
- भंडारा– गोंदिया– अविनाश ब्राह्मणकर, भाजप
- सांगली– सातारा– धैर्यशील कदम, भाजप
- परभणी– हिंगोली- सईद खान, शिवसेना
- सोलापूर– राजेंद्र राऊत, भाजप
- धाराशिव–लातूर– बीड– बसवराज पाटील, भाजप
- नागपूर– राजीव पोतदार, भाजप
- जळगाव– नंदकिशोर महाजन, भाजप
- अमरावती– प्रवीण पोटे, भाजप
- नांदेड– अमर राजूरकर, भाजप
एकनाथ शिंदेंनी तातडीने गोकुळ गीतेंना मुंबईला बोलावलं, VIDEO:
संबंधित बातमी:
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?