Nashik Vidhan Parishad Election Result 2026: उदय सामंत-महाजनांनी ताकद पुरवली, तरी गोकुळ गितेंनी नरेंद्र दराडेंचा गेम केला, निकाल लागताच पडलेल्या चेहऱ्याने बाहेर येऊन म्हणाले…


Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आघाडीवर असल्याने महायुतीला तगडा धक्का बसला आहे. पहिल्या फेरीतच गोकुळ गीते यांनी 150 पैकी 100 हून अधिक मतांचा कोठा पूर्ण करताच नरेंद्र दराडे यांनी आपला विश्वासघात झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. गोकुळ गीतेंचा आघाडीने नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील गणिते बदलली आहेत. दुसरीकडे, गोकुळ गीतेंना 389 मते मिळाल्याचा समर्थकांचा दावा आहे. 

110 टक्के विश्वासघात, केसाने गळा कापला

दरम्यान, निकालानंतर नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे म्हणाले की, महायुतीमधील घटक पक्षांवर आम्ही ज्या अपेक्षेने विश्वास ठेवला होता, तसे मतदान झाले नाही. 100 टक्के शिवसेनेचा विश्वासघात झाला आहे  भाजपची 200 मते आणि शिवसेनेची 170 मते होती. उर्वरित मते महाविकास आघाडी व इतरांची होती. समोरच्या उमेदवाराची आकडेवारी पाहता महायुतीमध्ये दगाफटका झाल्याचे स्पष्ट दिसते. निवडणुकीच्या काळात “मी माघार घेतो, मी तुमच्यासोबत आहे, आम्ही प्रचार करत नाही” असे सांगून केवळ दिशाभूल करण्याचे काम केले गेले आणि शेवटी केसाने गळा कापला गेला, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, छगन भुजबळ किंवा इतर नेत्यांच्या नावाबाबत विचारले असता, त्यांनी वैयक्तिक कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला. मात्र, महायुतीच्या घटक पक्षांकडून दगाफटका झाल्याचा पुनरुच्चार केला. नाशिक जिल्ह्यात या निवडणुकीच्या संदर्भात जे काही घडले, त्याची सविस्तर माहिती आणि अहवाल ते शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

नाशिक अंतिम निकाल

  • नाशिक एकूण मतदान – 618
  • अवैध मतदान – 13
  • वैध मतदान – 605
  • फायनल कोटा – 303
  • अपक्ष गोकुळ गीते – 357
  • शिवसेना नरेंद्र दराडे – 248

विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांचा निकाल- (Vidhan Parishad Election Result 2026 Winner List)

  1. ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
  2. यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना,  (बिनविरोध)
  3. रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस,  (बिनविरोध)
  4. पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस,  (बिनविरोध)
  5. वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप,  (बिनविरोध)
  6. अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप,  (बिनविरोध)
  7. छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
  8. नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
  9. भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
  10. सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
  11. परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
  12. सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
  13. धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
  14. नागपूर- राजीव पोतदार, भाजप
  15. जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
  16. अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
  17. नांदेड– अमर राजूरकर, भाजप

कुठे किती टक्के मतदान झाले? (Vidhan Parishad Election 2026 Result) 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *