Virat Kolhi: विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं


Virat Kolhi Favourite Singer Name and Song: भारतातील सुप्रसिद्ध  क्रिकेटर विराट कोहलीचा (Virat Kohli) चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याची सोशल मीडियात (Social Media) फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.  विराट कोहलीची (Cricketer) प्रत्येक स्टाइल कॉपी केली जाते.  त्याचे मैदानातील आणि मुलाखतीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. विराट कोहलीने (Karan Aujla) नुकतंच त्याच्या ब्रँड वन8 कम्यूनचा ग्लोबल प्रीमिअर आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्याचे बरेचसे फॅन्स उपस्थित होते. 21 जुलै रोजी दिल्लीतील द्वारकास्थित यशभूमिमध्ये इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यानं आपल्या आवडत्या गाण्याबद्दल आणि सिंगरबद्दल माहिती दिली.   

विराट कोहली कोणत्या सिंगरचा चाहता? (Virat Kohli Loves Winning Speech Song)

दिल्लीमधील आयोजित कार्यक्रमात विराट कोहलीसोबत पंजाबी सिंगर करण औजला देखील उपस्थित होता.  दोघांचेही फॅन  फॉलोइंग खूप मोठा आहे.  यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चेदरम्यान, विराटने करणने गायलेल्या एका गाण्याला फेवरेट म्हटले आहे, तसेच गायकाचेही कौतुक केलं आहे. विराट कोहलीने सांगितलं की,  करिअरच्या सुरुवातीपासून विराट कोहली करण औजलाचा खूप मोठा चाहता आहे. विराट कोहलीने सांगितलं की, त्याला करणने गायलेले एक गाणं प्रचंड  आवडतं. 

विराटने इव्हेंटमध्ये सांगितलं की, त्याला गायकाचे  व्हिनिंग स्पीच हे गाणं प्रचंड आवडतं.  विराट हे गाणं  प्रत्येक सामन्यापूर्वी ऐकतो. विराटने यावेळेस  करण औजलाचंही कौतुक केलं. ‘तुम्ही मनापासून गाणी लिहिता.  तुमच्या क्रिएशनमधून ते दिसून येतं. तुमच्या  आयुष्याची कथा देखील खूप खास आहे’,  असं विराट करणला म्हणाला. या इव्हेंटमध्ये विराट करणचं कौतुक करत म्हणाला, ‘तुमचं व्हिनिंग स्पीच हे गाणं मला प्रचंड आवडतं.  या गाण्यातून तुमचं स्ट्रगल दिसून येतं.  या गाण्यातून  माझ्या आयु्ष्याची झलकही दिसते’.

‘लहान वयात मी माझ्या वडिलांना गमावलं आहे.  त्यामुळे हे गाणं अगदी माझ्या हृदयाजवळ आहे. हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. क्रिकेट सामना खेळण्यापूर्वी मी अनेकदा हे गाणं ऐकलं आहे’, असं विराट कोहली म्हणतो.   सध्या विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   विराट कोहली आणि करण औजलाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यानं आपल्या कारकि‍र्दीत अनेक हिट गाणी दिली आहेत. केवळ भारतात  नसून, त्याच्या चाहत्यांचं जाळं  जगभरात पसरलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लेक रेवती सुळेच्या लग्नात आई सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज, ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *