TV Actress: टीव्ही अभिनेत्रीनं चाहत्यांना दिली गुडन्यूज; लग्नाच्या 2 वर्षांनंतर मुलगी झाली, लेकीची पहिली झलक व्हायरल


Aasiya Kazi Bandini: ‘बंदिनी’  मालिकेत ‘संतु’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आसिया काजी (Aasiya Kazi) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  ती आणि तिचा पती गुलशन नैन  यांनी मिळून चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे (Entertainment). आसिया  आई झाली असून, तिनं मुलीला जन्म दिला आहे. आसियाने पोस्ट शेअर करत सांगितलं की,  20 जून रोजी तिनं आपल्या बाळाचं स्वागत केलं आहे. (Actress)  अभिनेत्रीने मुलगी झाली असल्याचं सांगत आपल्या बाळाची पहिली झलक  चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या आसियाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आसियाच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव (Aasiya Kazi Blessed With Baby Girl)

अलिकडेच आसिया काजीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने आपल्या मुलीची पहिली झलक  सोशल मीडियात शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये बाळाचे हात, ओठ आणि पाय दिसत आहेत. तिनं  पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘यासाठी आमची निवड केल्याबद्दल देवा तुझे खूप आभार.  आम्ही आमच्या लेकीला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करु’, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.  

दरम्यान, अभिनेत्रीच्या पोस्टवर पती गुलशनने कमेंट केली आहे. ‘… आणि अशा पद्धतीने जून हा महिना माझा फेवरेट महिना बनला आहे’.  कोणत्याही कपलसाठी बाळाचा जन्म होणं, ही खूप मोठी गोष्ट असते.  गुलशन आणि आसियाला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या आयुष्यात  नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे.  आसियाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर, तिच्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

 

 तिच्या पोस्टवर केवळ नेटकरी नाही तर, दिव्यांका त्रिपाठीचे पती विवेक दहियाने कमेंट करुन  आसियाला अभिनंदन केलं आहे. ‘मुलगी झाली आहे, अभिनंदन’, असं म्हणत त्यानं अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या.  मिळालेल्या माहितीनुसार,  आसिया आणि गुलशन हे तब्बल 8 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2024 साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2 वर्षांनंतर त्यांच्या घरात पाळणा हलला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लेक रेवती सुळेच्या लग्नात आई सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज, ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *