Atul Londhe: भाजपने दहा-दहा लाख देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले; अतुल लोंढेंचा गंभीर आरोप


Nagpur Vidhan Parishad Election Result 2026: नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार यांनी या निवडणुकीत 682 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून त्यांना केवळ 130 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसची स्वतःची 170 मते होती आणि महाविकास आघाडीची एकूण 211 मते असतानाही अतुल लोंढे यांना फक्त 130 मते मिळाली. याचाच अर्थ काँग्रेसच्या किमान 40 नगरसेवकांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर मित्रपक्षांच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला साथ दिली. दुसरीकडे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, भाजपने प्रत्येकी 10 लाख रुपये देऊन 100 मतदारांची ‘क्रॉस वोटिंग’ करून घेतली.

विधान परिषदेच्या एकूण 17 जागांपैकी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बहुतांश जागांवर विजय मिळवला आहे. यात नागपूरसह जळगाव, अमरावती, नांदेड, सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. केवळ नाशिकमध्ये महायुतीला धक्का बसला असून अपक्ष गोकुळ गीते यांनी विजय मिळवला आहे. महायुतीच्या या निकालामुळे नागपूरमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आणि मत फूट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहा दहा लाख रुपये देऊन 100 मतांची क्रॉस वोटिंग करून घेतली 

दरम्यान, अतुल लोंढे यांनी दहा दहा लाख रुपये देऊन 100 मतांची क्रॉस वोटिंग करून घेतल्याचा गंभीर आरोप नागपूर विधानपरिषद मतदारसंघातून काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी केला. महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या फुटलेल्या मतांसंदर्भात तक्रार करणार नाही असेही अतुल लोंढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुळात मी निवडणूक पराभूत झालो नाही, तर नैतिक दृष्टिकोनातून मी निवडणूक जिंकलो आहे कारण नागपूरात भाजपच्या दादागिरीसमोर मी उभं राहून निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही आणि किमान मला मिळालेले 130 काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार विकले गेले नाही हेच या निवडणुकीतून सिद्ध झालंय असं अतुल लोंढे म्हणाले.

विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांचा निकाल- (Vidhan Parishad Election Result 2026 Winner List)

  1. ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
  2. यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना,  (बिनविरोध)
  3. रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस,  (बिनविरोध)
  4. पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस,  (बिनविरोध)
  5. वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप,  (बिनविरोध)
  6. अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप,  (बिनविरोध)
  7. छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
  8. नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
  9. भंडारागोंदिया– अविनाश ब्राह्मणकर, भाजप
  10. सांगलीसातारा– धैर्यशील कदम, भाजप
  11. परभणी– हिंगोली- सईद खान, शिवसेना
  12. सोलापूर– राजेंद्र राऊत, भाजप
  13. धाराशिवलातूरबीड– बसवराज पाटील, भाजप
  14. नागपूर– राजीव पोतदार, भाजप
  15. जळगाव– नंदकिशोर महाजन, भाजप
  16. अमरावती– प्रवीण पोटे, भाजप
  17. नांदेड– अमर राजूरकर, भाजप

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *