Success Story : 90 दिवसांत कमवा अडीच लाख नफा, ​नितीन यांनी केला दुधी भोपळ्याचा प्रयोग यशस्वी, सांगितला फॉर्म्युला, Video | शेती बातम्या


Last Updated:

तरुणाने आपल्या अवघ्या 2 एकर शेतात दुधी भोपळ्याची यशस्वी लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

+

News18

News18

सोलापूर : शेती परवडत नाही अशी ओरड चहुबाजूने होत असतानाच, योग्य तांत्रिक ज्ञान आणि आधुनिक नियोजनाच्या जोरावर कमी जमिनीतही लाखोंचे उत्पन्न घेता येते, हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. नितीन सूर्यभान रोकडे या बीएससी ऍग्री पदवीधर तरुणाने आपल्या अवघ्या 2 एकर शेतात दुधी भोपळ्याची यशस्वी लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

बीएससी ऍग्रीच्या ज्ञानाचा शेतीत वापर

​नितीन रोकडे यांनी त्यांचे कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या 2 एकर क्षेत्रावर दुधी भोपळ्याची लागवड करण्याचे नियोजन केले. बाजारातील मागणी आणि पिकाचा कालावधी लक्षात घेऊन त्यांनी आधुनिक तांत्रिक पद्धतींचा वापर करून ही शेती फुलवली.

​अवघ्या 90 दिवसांत बंपर उत्पन्न

​दुधी भोपळ्याच्या या पिकासाठी नितीन यांना प्रति एकरी साधारण 30 हजार रुपये इतका खर्च आला. म्हणजेच 2 एकरांसाठी एकूण 60 हजार रुपयांचे भांडवल त्यांनी गुंतवले होते. अत्यंत काटेकोर नियोजन, खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यामुळे अवघ्या 90 दिवसांच्या (3 महिने) कालावधीत हे पीक काढणीस तयार झाले. सध्या बाजारात दुधी भोपळ्याला मिळणारा दर आणि एकूण उत्पादन पाहता, सर्व खर्च वजा करून नितीन यांना 2 ते 2.50 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे.

तरुण शेतकऱ्यांसाठी ठरले प्रेरणास्थान

नितीन रोकडे यांचे हे यश पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. पारंपरिक शेती पद्धती बदलून बाजाराचा अभ्यास आणि कृषी शास्त्रातील तंत्रज्ञानाचा वापर केला, तर शेतीमधून कमी दिवसांत भरघोस नफा मिळवता येतो, असा विश्वास नितीन रोकडे यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

मराठी बातम्या/कृषी/

Success Story : 90 दिवसांत कमवा अडीच लाख नफा, ​नितीन यांनी केला दुधी भोपळ्याचा प्रयोग यशस्वी, सांगितला फॉर्म्युला, Video



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *