लिंगपिसाट खरातवरील सिनेमात एकनाथ शिंदे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांचीही व्यक्तीरेखा… कोणी साकारली भूमिका?; दीपाली सय्यद यांनी दिली मोठी बातमी – Marathi News | Maharashtra epstein files film deepali sayyad eknath shinde anjali damania sushma andhare


भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची चर्चा संपूर्ण राज्यात गाजली होती. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते. तसेच खरात हा आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता, याच्या मदतीने त्याने करोडोंची माया जमवली आहे. अशातच आता या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सैय्यद-भोसले रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक चर्चित चेहऱ्यांच्या भूमिका कोणी केल्या याबाबत दिपाली सय्यद यांनी माहिती दिली आहे.

अनेक नेत्यांची भूमिका

दीपाली सय्यद यांनी या चित्रपटाबाबत बोलताना म्हटले की, आता टीचर लॉन्च झाला आहे, सगळ्यांनी बघितला आणि लोक त्याला खूप प्रतिसाद चांगला देत आहेत. दोन ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहेत. हा एक वेगळा आणि रियल सब्जेक्ट आहे. या चित्रपटात बरेच कलाकार आहेत. स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत सगळं येईल. प्रत्येक नेत्यांचा यामध्ये रोल आहे.

अंधारे-दमानिया यांची आक्रमकता सिनेमात दिसणार

पुढे बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, सिनेमात एकनाथ शिंदे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांचीही व्यक्तिरेखा आहे. मात्र या नेत्यांची भूमिका कोणी साकारली हे आगामी काळात समोर येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हीच आक्रमकता आता या चित्रपटातून समोर येणार आहे.

सिनेमा रिलीज झाल्यानंतर राजकारणात बदल होणार

दीपाली सय्यद यांनी या चित्रपटाच्या शूटिंगवेळी धमकी आली होती. यावर बोलताना सय्यद यांनी सांगितले की, धमक्या आता थांबल्या आहेत, पण धाकधूक आहे. त्यामुळे शूटिंगच्या सेटवर गार्ड ठेवले आहेत. मी तक्रार केली नाही, मला असं वाटत होतं की अजून फोन आले तर मी जाऊन तक्रार करणार आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकारणात बदल होईल, असा दावाही दीपाली सैय्यद यांनी केला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *