Sanchita Ugale TV Actress Last Rites: ‘संचू उठ ना गं… मला आई म्हण ना…’; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल


Sanchita Ugale TV Actress Last Rites: ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) फेम मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) संचिता उगले (Actress Sanchita Ugale) हिनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आणि अख्खं मनोरंजनविश्व (Entertainment World) हादरलं. वयाच्या 30व्या वर्षी संचितानं राहत्या घरात साडीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेत स्वतःच्या हातानंच आपल्या आयुष्याचा दोर कापला. अनेक प्रसिद्धी मिळालेल्या प्रोजेक्ट्समध्ये झळकलेल्या संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं एवढा टोकाचा निर्णय का घेतला? याचं कारण मात्र, अद्याप कळालेलं नाही. संचिताच्या आत्महत्येच्या निर्णयानं उगले कुटुंबीयांनाही जबर धक्का बसला. लाडक्या लेकीनं एवढं नाव कमावलं आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच असं अचानक आयुष्य संपवलं, या दुर्दैवी घटनेनं उगले कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकलीय. आपली लाडाची सतत हसत-खेळत वावरणारी लेक अशी आपल्यासमोर निपचीत पडलीय, हे पाहणंच त्यांचं काळीज पिळवटणारं आहे. संचिताला अखेरचा निरोप देताना अख्खं उगले कुटुंब रडून रडून पार कोसळून गेलेलं. पोटच्या लेकीला शेवटचा निरोप देताना तिच्या माऊलीचा आक्रोश काळीज चिरणारा होता. सध्या संचिताच्या अखेरच्या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

राहत्या घरात कापला आयुष्याचा दोर (Sanchita Ugale Death)

‘कुमकुम भाग्य’ या गाजलेल्या टेलिव्हिजन मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री संचिता उगले ही नालासोपारा पूर्व भागातील आचोळे इथल्या साई संतोषी अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिच्या कुटुंबात ती, आई-वडील आणि तिची पंझरा वर्षांची लहान बहीण होती. रविवारी संध्याकाळी संचितानं आपल्या बेडरुमचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर तिनं बराच वेळ दरवाजा उघडला नाही, म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. 

दरवाजा उघडल्यानंतर जे दिसलं, ते काळीज पिळवटणारं होतं. संचिता पंख्याला साडीच्या सहाय्यानं लटकलेल्या अवस्थेत समोर दिसली. तिला तात्काळ खाली काढलं आणि जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, वेळ हातातून निघून गेलेली, संचिता उगले हिनं जगाचा अखेरचा निरोप केव्हाच घेतलेला. डॉक्टरांनी संचिताला मृत घोषित केलं आणि अख्ख्या उगले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

लाडक्या संचिताचं पार्थिव पाहून आईचा आक्रोश (Sanchita Ugale Last Rites)

संचिता उगले हिनं आयुष्य संपवलं आणि अख्खी इंडस्ट्री हादरली. संचिता उगले हिच्या अंत्यसंस्काराचे काही क्षण सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झालेत. तिच्या आईचा आक्रोश आणि ती विचारत असलेला प्रश्न काळीज चिरतोय. तिची आई सारखी संचिताला लाडानं हाका मारतेय. ‘संचू ए संचू उठ ना… तू मला आई म्हण ना.. ए बबड्या.. का असं केलंस गं?’, व्याकूळ होऊन तिला विचारणा करतेय. अख्खं उगले कुटुंब संचिताला निरोप देताना कोसळल्याचं पाहायला मिळतंय. 

साडीच्या सहाय्यानं गळफास घेत संपवलं आयुष्य (Sanchita Ugale Ends Her Life)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले आपले आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपाऱ्यातील परिसरात राहत होती. घरी एकटी असतानाच संचितानं टोकाचं पाऊल उचललं. संचितानं राहत्या घरात साडीच्या सहाय्यानं पंख्याला लटकून गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.   

दरम्यान, संचिता उगले अल्पावधीतच टीव्ही मालिकेत लोकप्रिय झाली होती. झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत तिनं साकारलेली दिया टंडन ही व्यक्तिरेखा विशेष गाजलेली. ‘वागळे की दुनिया’, ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ या मालिकेतंही तिनं महत्त्वाची भूमिका साकारलेली. याशिवाय विक्की कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमातही तिनं साकारेली व्यक्तिरेखा गाजलेली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही…’; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले…

ABP Majha च्या बातम्या LIVE





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *