Gold-Silver Price Today: ग्राहकांना मोठा झटका! सोन्याच्या आयात शुल्कात वाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील आजचे भाव पाहा


Gold-Silver Price Today: सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राइस (Base Import Price) मध्ये वाढ केली आहे. सरकारने सोन्याच्या आयात किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5 डॉलरची वाढ केली असून चांदीच्या आयात किंमतीत प्रति किलो 83 डॉलरने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सोने अधिक महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवीन दरानुसार, सोन्याचा (Gold) बेस इम्पोर्ट प्राइस आता 1,348 डॉलर प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर चांदीचा बेस इम्पोर्ट प्राइस 2,175 डॉलर प्रति किलो इतका झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोन्याच्या आयात किंमतीत 80 डॉलर आणि चांदीच्या किंमतीत 276 डॉलरची कपात केली होती. मात्र आता अचानक वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

16 जून 2026 रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,51,530 रुपये, 22 कॅरेटसाठी 1,38,900 रुपये, तर 18 कॅरेट सोन्यासाठी 1,13,650 रुपये इतका आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,51,680 रुपये, तर चेन्नईत हा दर सर्वाधिक 1,53,490 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर  1,51,560 रुपये, 22 कॅरेट 1,38,930 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,13,680 रुपये इतका आहे.

चांदीच्या (Silver) किंमतीतही वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये 1 किलो चांदीचा दर 2,65,000 रुपये इतका आहे. तर चेन्नई, हैदराबाद, केरळ आणि कटकमध्ये हा दर 2,80,000 रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला आहे.

Gold-Silver: आयात नियम आणखी कडक

परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे आणि व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सोने व चांदीच्या आयात नियमांमध्ये कडक बदल केले आहेत. 99.9% किंवा त्याहून अधिक शुद्धता असलेल्या चांदीला आता ‘फ्री’ श्रेणीतून काढून ‘प्रतिबंधित’ श्रेणीत टाकण्यात आले आहे. तसेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आता चांदीची आयात केवळ अधिकृत बँका किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजूर केलेल्या एजन्सींमार्फतच करता येणार आहे. त्यामुळे बाजारातील किंमतींवर याचा आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरच्या किंमतीतील बदल आणि सरकारच्या आयात धोरणांमुळे आगामी काळात सोने-चांदीच्या दरात आणखी अस्थिरता पाहायला मिळू शकते. त्यामुळे गुंतवणूक (Investment) किंवा खरेदी करण्यापूर्वी दरांची खातरजमा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज तुमच्या शहरातील 24, 22, 18 कॅरेट सोन्याचे दर

शहर 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) 22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) 18 कॅरेट सोने (10 ग्रॅम)
दिल्ली ₹151680 ₹139050 ₹113800
मुंबई ₹151530 ₹138900 ₹113650
कोलकाता ₹151530 ₹138900 ₹113650
चेन्नई ₹153490 ₹140700 ₹118000
पटना ₹151580 ₹138950 ₹113700
लखनऊ ₹151680 ₹139050 ₹113800
मेरठ ₹151680 ₹139050 ₹113800
अयोध्या ₹151680 ₹139050 ₹113800
कानपूर ₹151680 ₹139050 ₹113800
गाझियाबाद ₹151680 ₹139050 ₹113800
नोएडा ₹151680 ₹139050 ₹113800
गुरुग्राम ₹151680 ₹139050 ₹113800
चंदीगड ₹151680 ₹139050 ₹113800
जयपूर ₹151680 ₹139050 ₹113800
लुधियाना ₹151680 ₹139050 ₹113800
गुवाहाटी ₹151530 ₹138900 ₹113650
इंदौर ₹151580 ₹138950 ₹113700
अहमदाबाद ₹151580 ₹138950 ₹113700
वडोदरा ₹151580 ₹138950 ₹113700
सुरत ₹151580 ₹138950 ₹113700
पुणे ₹151530 ₹138900 ₹113650
नागपूर ₹151530 ₹138900 ₹113650
नाशिक ₹151560 ₹138930 ₹113680
बेंगळुरू ₹151530 ₹138900 ₹113650
भुवनेश्वर ₹151530 ₹138900 ₹113650
कटक ₹151530 ₹138900 ₹113650
रायपूर ₹151530 ₹138900 ₹113650
हैदराबाद ₹151530 ₹138900 ₹113650
केरळ ₹151530 ₹138900 ₹113650

आज तुमच्या शहरातील चांदीचे दर

शहर 10 ग्रॅम चांदीचा भाव 100 ग्रॅम चांदीचा भाव 1 किलो चांदीचा भाव
दिल्ली ₹2650 ₹26500 ₹265000
मुंबई ₹2650 ₹26500 ₹265000
कोलकाता ₹2650 ₹26500 ₹265000
चेन्नई ₹2800 ₹28000 ₹280000
पटना ₹2650 ₹26500 ₹265000
लखनऊ ₹2650 ₹26500 ₹265000
मेरठ ₹2650 ₹26500 ₹265000
अयोध्या ₹2650 ₹26500 ₹265000
कानपूर ₹2650 ₹26500 ₹265000
गाझियाबाद ₹2650 ₹26500 ₹265000
नोएडा ₹2650 ₹26500 ₹265000
गुरुग्राम ₹2650 ₹26500 ₹265000
चंदीगड ₹2650 ₹26500 ₹265000
जयपूर ₹2650 ₹26500 ₹265000
लुधियाना ₹2650 ₹26500 ₹265000
गुवाहाटी ₹2650 ₹26500 ₹265000
इंदौर ₹2650 ₹26500 ₹265000
अहमदाबाद ₹2650 ₹26500 ₹265000
वडोदरा ₹2650 ₹26500 ₹265000
सुरत ₹2650 ₹26500 ₹265000
पुणे ₹2650 ₹26500 ₹265000
नागपूर ₹2650 ₹26500 ₹265000
नाशिक ₹2650 ₹26500 ₹265000
बेंगळुरू ₹2650 ₹26500 ₹265000
भुवनेश्वर ₹2800 ₹28000 ₹280000
रायपूर ₹2650 ₹26500 ₹265000
कटक ₹2800 ₹28000 ₹280000
हैदराबाद ₹2800 ₹28000 ₹280000
केरळ ₹2800 ₹28000 ₹280000

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

CNG PNG Price Hike Pune: पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *