Prasad Vedpathak Meets MNS Leaders: सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यानं जैन समुदायातील साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा (Jain White Strip) मुद्दा उचलून धरला होता. त्यानं सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करुन विरोध दर्शवला होता. त्याच्या घाटकोपर येथील सोसायटीच्या बाहेर पांढरी पट्टी मारण्यात आली होती. सोसायटीतील सदस्यांशी चर्चा न करता, बिल्डिंगच्या आवारात पांढरी पट्टी मारण्यात आलीच कशी? असा सवाल (Entertainment) त्यानं आपल्या व्हिडीओतून उपस्थित केला होता. वाद वाढल्यानंतर त्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणात भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी जैन समुदायाचे नेतृत्व करत प्रसाद वेदपाठकच्या भूमिकेचा विरोध केला होता. यानंतर त्याला धमक्या येऊ लागल्या. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत प्रसाद थेट मनसे पक्षाकडे मदतीसाठी धावला. त्यानं अलिकडेच मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली होती. तसेच ट्विट करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानं आपल्या ट्विटमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. त्याचं हे ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं होतं.
प्रसाद वेदपाठक घेणार मनसे नेत्यांची भेट (Prasad Vedpathak Will Meet MNS Leader Today)
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या संबंधित आज प्रसाद वेदपाठक मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची दुपारी 12 वाजता भेट घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद वेदपाठकच्या भूमिकेला मनसे पक्षाकडून पाठिंबा मिळणार असून, त्याच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, हे प्रकरण आणखी चिघळणार की निवळणार? हे येत्या काळात समोर येईल. दरम्यान, या भेटीनंतर मनसे नेते या प्रकरणी नेमकी कोणती अॅक्शन घेणार? प्रसाद वेदपाठकला नेमकं कुणाकडून धमक्या येत आहेत? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका आहे तरी काय? (Prasad Vedpathak Controversy)
कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर प्रसाद वेदपाठकनं जैन धर्मगुरुंसाठी घाटकोपरमधील ‘कैलास अव्हेन्यू’ सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा विरोध केला होता. प्रसादच्या म्हणण्यानुसार, सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता त्यांनी ही पांढरी पट्टी मारली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा त्यानं आपल्या व्हिडीओतून केला. प्रसादनं या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवला. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून याची माहिती दिली. वाढत्या वादानंतर ती पांढरी पट्टी काढण्यात आली. दरम्यान, या प्रकरणानंतर त्याला धमक्या मिळत असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं ट्विट केलं होतं. हे प्रकरण इतकं व्हायरल झालं की, थेट मनसे दरबारीपर्यंत पोहोचलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष