Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा….


नांदेड : नांदेडमधून काही महिन्यांपूर्वी एक हादरवणारी घटना समोर आली होती, आंचल मामीडवार (Aanchal Mamidwar) या तरुणीच्या प्रियकराचा तिच्याच वडिलांनी आणि भावाने गोळ्या घालून आणि डोक्यात फरशीने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती, या घटनेत आंचल मामीडवार (Aanchal Mamidwar) या तरुणीचा प्रियकर असलेला सक्षम ताटे या तरुणाचा मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यासह देशभरात चांगलंच चर्चेत आलं. या प्रकरणात आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंचल मामीडवारने (Aanchal Mamidwar) केली होती. तसेच तिने सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केलं होतं. आता आपण कायम सक्षमच्याच घरी राहणार, त्याच्या आई वडिलांचा आधार बनणार असंही तिने त्यावेळी म्हटलं होतं. या घटनेची चर्चा सर्वत्र झाली होती. परंतु आता आयुष्यभर प्रियकर सक्षमच्याच घरी राहणार असं म्हणणाऱ्या आंचल मामीडवारने (Aanchal Mamidwar) त्याचं घर सोडलं आहे. ती आता आपल्या आजीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली होती. सक्षमच्या आईने एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती सांगितली त्यानंतर ट्रोल होत असलेल्या आंचलने समोर येऊन घर सोडण्याचं कारण सांगत सक्षमचा भाऊ तिच्यासोबच चुकीचं वागत असल्याचं तिने सांगितलं. त्यावरून आता सक्षमच्या आईने आणि आत्याने आंचलचे सक्षमच्या भावासोहत झालेले बोलणे आणि ती त्यात काय म्हणते याची माहिती सांगत माझ्या मुलाला बदनाम करू नको असं म्हटलं आहे.(Aanchal Mamidwar)

Aanchal Mamidwar :  तो आपल्यासोबत चुकीचं वागत होता…

दरम्यान आता आंचल मामीडवारने सक्षम ताटेचं घर सोडल्यानं याची चांगलीच चर्चा सुरू आहे. याबाबत तिला विचारलं असता, तिने धक्कादायक दावा करत म्हटलं की, तिने सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप केला आहे. तो आपल्यासोबत चुकीचं वागत होता, त्याने अनेकदा मला चुकीचा स्पर्श केला असा आरोप आंचलने केला आहे. त्याचबरोबर तो जो माझाशी वागत होता, याची मी याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना देखील दिली, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून आपलं त्याचं घर सोडलं असं आंचलने म्हटलं होतं, परंतु या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. 

Aanchal Mamidwar :  आमचं एकच लेकरू आहे, मी तिला हात जोडून…

आंचलने सक्षमच्या लहान भावावर आरोप केल्यानंतर आता सक्षमच्या आत्या आणि आईने मोबाईलमधील काही मेसेज दाखवून मोठा दावा केला आहे, त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना चॅट दाखवत म्हटलं की, आता आमचं एकच लेकरू आहे, मी तिला हात जोडून विनंती करते की आता आमच्या मुलाला बदनाम करू नको. त्याने तुला काहीही केलं नाहीये. तो सारखा तुला वहिनी वहिनी करायचा, असं सक्षमच्या आत्याने म्हटलं आहे. दरम्यान यावेळी सक्षमच्या आत्याने आंचलचे काही मेसेज देखील प्रसारमाध्यमांना दाखवले आहेत, ज्यामध्ये आंचल सक्षम ताटेच्या भावाला ‘बोल की बाळा’ असं म्हणत आहे. तसेच तिचे इतरही काही मेसेज समोर आले आहेत, यावरून सक्षण ताटेचा भाऊ आणि आंचलमध्ये संवाद सुरू होता, असं दिसून येत आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *