Rahu Transit 2026: जुलै ते डिसेंबर..3 राशींचे लोक ताकही फुंकून पितील! पापी राहूचा अंगारक योग सक्रिय, पैसा जपून वापरा, जोडीदाराशी मतभेद?


Rahu Transit 2026: ते म्हणतात ना, माणसावर वाईट वेळ कधीच सांगून येत नाही, सर्वकाही सुरळीत असताना अचानक एखादी अशी घटना घडते. ज्यामुळे आयुष्याला मोठी कलाटणी मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-ताऱ्यांच्या हालचाल माणसाच्या सुख-दु:खासाठी कारणीभूत ठरतात. असाच एक ग्रह राहू.. ज्याला पापी ग्रह म्हटले जाते. या राहूच्या नक्षत्र बदलामुळे सध्या अंगारक योग सक्रिय झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग काही राशींसाठी आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक अडचणी वाढवू शकतो. अंगारक योग या 3 राशींसमोर नवीन आव्हाने उभी करू शकतो. जुलै ते डिसेंबर या काळात या 3 राशींना प्रत्येक मोठ्या निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. जाणून घेऊया कोणत्या 3 राशींना अंगारक योगाचे नकारात्मक परिणाम अनुभवण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

जुलै ते डिसेंबर या काळात 3 राशींना सावधगिरी बाळगावी (Rahu Transit 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, 30 जुलै, 2026 रोजी राहूने धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी आहे. जेव्हा राहू आणि मंगळाच्या ऊर्जा एकत्र येतात, तेव्हा अंगारक योग तयार होतो. हा योग शक्तिशाली आणि उग्र मानला जातो. राहू 2 डिसेंबर 2026 पर्यंत या नक्षत्रात राहील, त्यामुळे या राशींनी या काळात सावधगिरी बाळगावी. हा अंगारक योग आव्हानात्मक असेल. या काळात 3 राशींना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गुंतवणूक, व्यवहार आणि कौटुंबिक बाबींबाबत माहितीपूर्ण निर्णय घेणे उत्तम राहील. जाणून घ्या की कोणत्या 3 राशींना आर्थिक नुकसान होऊ शकते.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांनी या काळात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. मोठी गुंतवणूक किंवा नवीन व्यवसाय करार करण्याची योजना असल्यास, प्रथम सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. घाईने घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करणे देखील चांगले नाही. कुटुंबातील सदस्याबद्दलची चिंता वाढू शकते, त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा बाळगा.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होईल. जोखमीच्या गुंतवणुकी टाळणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे उत्तम ठरेल.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पैसे उधार देण्यापूर्वी किंवा पैशांचे व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल; घाईघाईत बोलल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक गैरसमजांचीही चिन्हे आहेत, तसेच चुकीची गुंतवणूक किंवा आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

हेही वाचा :

Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म – निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *