Netflix Indian Hit films Pskistan: ‘राजा शिवाजी’ ते ‘भूत बंगला’; पाकिस्तानमध्ये या 6 भारतीय चित्रपटांनी घातलाय धुमाकूळ; OTTवर दणकून चालतायत आपल्या फिल्म्स

Netflix Hit in Pakistan: पाकिस्तानमध्ये अनेकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांवर ‘पाकिस्तानविरोधी आशय’ असल्याचं कारण देत बंदी घातली जाते. मात्र, ओटीटी माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे प्रेक्षकांना आता कोणत्याही देशातील चित्रपट सहज पाहता येऊ लागले आहेत. अशातच नेटफ्लिक्सवर भारतातील सहा चित्रपट पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. यात ‘राजा शिवाजी’पासून ‘भूत बंगला’पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

भूत बंगला

अक्षय कुमारचा हॉरर- कॉमेडी भूतबंगला चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांनंतर या चित्रपटाने OTT वरही दमदार कामगिरी केली आहे. भारतासोबतच पाकिस्तानमध्येही या चित्रपटाला मोठी पसंती मिळत असून तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

Netflix Indian Hit films Pskistan: 'राजा शिवाजी' ते 'भूत बंगला'; पाकिस्तानमध्ये या 6 भारतीय चित्रपटांनी घातलाय धुमाकूळ; OTTवर दणकून चालतायत आपल्या फिल्म्स

ब्लास्ट

ब्लास्ट हा तमिळ अ‍ॅक्शनपट चित्रपटगृहांमध्ये मोठी कमाई करून गेला. त्यानंतर घरबसल्या पाहण्याच्या माध्यमावर आल्यानंतरही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पाकिस्तानमध्ये हा चित्रपट सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. यात अर्जून सर्जा प्रमुख भूमिकेत आहेत.

Netflix Indian Hit films Pskistan: 'राजा शिवाजी' ते 'भूत बंगला'; पाकिस्तानमध्ये या 6 भारतीय चित्रपटांनी घातलाय धुमाकूळ; OTTवर दणकून चालतायत आपल्या फिल्म्स

मां बहन

मां बेहेन या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या भूमिका विशेष गाजत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. भारतात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर पाकिस्तानमध्येही हा चौथ्या क्रमांकावर आहे.

Netflix Indian Hit films Pskistan: 'राजा शिवाजी' ते 'भूत बंगला'; पाकिस्तानमध्ये या 6 भारतीय चित्रपटांनी घातलाय धुमाकूळ; OTTवर दणकून चालतायत आपल्या फिल्म्स

धुरंधर द रिव्हेंज

धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये सलग सात आठवडे लोकप्रियतेत स्थान टिकवून ठेवलं आहे. रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही चर्चेत आहे.

Netflix Indian Hit films Pskistan: 'राजा शिवाजी' ते 'भूत बंगला'; पाकिस्तानमध्ये या 6 भारतीय चित्रपटांनी घातलाय धुमाकूळ; OTTवर दणकून चालतायत आपल्या फिल्म्स

कलंक

कलंक हा वरूण धवन आणि आलिया भट यांचा प्रेमकथा आधारित चित्रपट आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या पाकिस्तानमध्येही लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत आहे.

Netflix Indian Hit films Pskistan: 'राजा शिवाजी' ते 'भूत बंगला'; पाकिस्तानमध्ये या 6 भारतीय चित्रपटांनी घातलाय धुमाकूळ; OTTवर दणकून चालतायत आपल्या फिल्म्स

राजा शिवाजी

मराठीतील गाजलेला राजा शिवाजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये विक्रमी कमाई केल्यानंतर आता घरबसल्या पाहण्याच्या माध्यमावरही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, अभिषेक बच्चन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला पाकिस्तानमध्येही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *