Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरीची (Chetan Choudhari) पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीचनंतर हजर केलं जाईल. या सुनावणी आधी आतापर्यंतची सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. केतन अग्रवालचा खूनाचा कट आणखी एका तरुणाला माहिती होता. या तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सदर प्रकार आणखी कोणाला तरी माहिती असावा, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांचा तोच संशय आता खरा ठरल्याचं दिसून येत आहे.
केतन अग्रवालच्या खूनाचा कट आणखी एका तरुणाला माहिती होता. हा तरुण चेतन चौधरी याचा वर्गमित्र आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणात आणखी एका तरुणाचे नाव समोर येते आहे. हा तरुण चेतन चौधरी याचा वर्ग मित्र आहे. केतनच्या खूनाचे प्लॅनिंग चेतन आणि सिया या दोघांनी त्याच्यासोबत डिस्कस केले होते. त्या तरुणाला लोहगडावर चालण्याचा देखील आग्रह या दोघांनी केला होता. मात्र तो तरुण 18 जून रोजी लोहगडावर गेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर चेतन पहिल्यांदा याच त्याच्या मित्राला भेटला आहे. सिया देखील या तरुणासोबत बोलली असल्याची माहिती आहे.
केतन अग्रवाल प्रकरणात तिसऱ्याची एन्ट्री, कोण आहे तो तरुण?- (Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune)
सदर तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनाच्या संपर्कात होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतला असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान या तरुणाने केतन याचा खून करू नका, असे देखील चेतन आणि सिया या दोघांना सांगितल्याची माहिती आहे.
पोलीस कोर्टात नसरापूरप्रकरणातील ती थिअरी मांडणार- (Lohagadh Case Pune)
आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत कसून तपास करण्यात आला, यात पोलिसांच्या हाती लागलेले महत्वाचे धागेदोरे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणामध्ये (Nasrapur Pune Case) पोलिसांनी न्यायालयात ‘लास्ट सीन टुगेदर’ ही थिअरी मांडली होती. त्यानूसार या लोहगडावरील घटनेमध्ये देखील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक तपासानुसार पोलिस ‘लास्ट सीन टुगेदर’ ही थिअरी न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव- (Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune)
दरम्यान, पोलीस जेव्हा तपासणी आणि पंचनामा करण्यासाठी सियाला घेऊन तिच्या घरी आले, त्यानंतर बाहेर निघताना सियाने अश्लील हावभाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडे जप्त करण्यासाठी सियाला घेऊन पुण्यातील निवासस्थानी पोहचले होते. पुण्यातील निवासस्थानातून बाहेर पडताना माध्यमांचे कॅमेरे बघताच सिया गोयलने अश्लील हावभाव केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. केतन अग्रवाल प्रकरणात अटक असलेल्या सिया गोयलचा हा मुजोरपणा आणि माज असल्याच्या टीका आता तिच्यावर करण्यात येत आहेत. व्हायरल व्हिडीओनंतर सिया गोयलवर सगळ्या स्तरातून टीका होत आहे.
संबंधित बातमी: