Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..


Budh Margi 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, येत्या 24 जुलै 2026 ची रात्र (म्हणजेच 25 जुलैच्या सकाळी) जवळपास 3 वाजून 54 मिनिटांनी बुद्धी, संवाद आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह आपल्या स्वराशी म्हणजेच मिथुन राशीत मार्गी होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह मार्गी होतो तेव्हा तो आपल्या सरळ रेषेने चालतो. ज्यामुळे त्याच्या परिणामांना गती मिळते.

बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो. काही राशींना या काळात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope) 

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तसेच, गैरसमजही निर्माण होऊ शकतात. तुमच्या आरोग्यावर तसेच, मानसिक स्वास्थ्यावर याचा परिणाम होऊ शकतो. या दरम्यान कोणाशीही पैशांचे व्यवहार करु नका. कोणाला पैसे उधार म्हणून देऊ नका. ते तुम्हाला परत मिळतील की नाही सांगता येत नाही. सध्या गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. बोलताना शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करा.

कन्या रास (Virgo Horoscope) 

कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे बुधाच्या संक्रमणाचा तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. कामाच्या वातावरणावर थेट परिणाम होऊ शकतो. तसेच, नोकरी संदर्भात अचानक तणाव वाढू शकतो. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तणावामुळे निद्रानाश किंवा डोकेदुखी यांसारख्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. कामाच्या जागी कोणत्याही प्रकारच्या गॉसिप आणि राजकारणापासून दूर रहा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची मार्गी चाल तुमच्या आरोग्यावर परिणाम करु शकते. तुमच्यासाठी हा काळ फार संवेदनशील असणार आहे. या काळात तुमच्या शत्रूंपासून दूर राहा. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होऊ शकतो. वाहन चालवताना विशेष सावध राहा. कोणत्याही कागदपत्रावर न वाचता सही करू नका.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी, हा काळ कठीण असणार आहे. या काळात तुमच्या कौटुंबिक स्थितीवर याचा परिणाम होऊ शकतो.  तसेच, कुटुंबियांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मालमत्ता किंवा वाहनांशी संबंधित बाबींमध्ये अडथळे येऊ शकतात. नोकरी-व्यवसायात असलेल्यांचे मन कामावरून विचलित होऊ शकते. या काळात नवीन गाडी खरेदीची योजना काही काळासाठी पुढे ढकलणे चांगले ठरेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी फक्त 2 राशी ठरतील लकी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *