Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: ‘सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..’ रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं


Krutila Tulaskar on Apurva Nemlekar: झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) काही दिवसांपूर्वी मालिकेच्या निर्मात्यांवर काही आरोप केले होते. या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अपूर्वाच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) शेवंताच्या भूमिकेत दिसलेली. अलीकडेच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये अपूर्वाने शेवंताच्या भूमिकेविषयी आणि मालिका सोडल्यावर झालेला रिप्लेसमेंटविषयी भाष्य केलं होतं. जो अभिनेत्रीला शेवंताच्या रोलसाठी रिप्लेस करण्यात आलं तिच्यावरही अपूर्वाने काही वक्तव्य केली होती. त्यावरून कृतिकानेही व्हिडिओ करत अपूर्वाला सुनावलं. अपूर्वाच्या वक्तव्यानंतर शेवंताची रिप्लेसमेंट साकारणाऱ्या अभिनेत्रीने व्हिडिओ करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अभिनेत्री कृतिकाने चांगलंच सुनावलं. शेवंता साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींमध्ये पडलेल्या या ठिणगीची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री कृतिका तुळसकर?

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या पॉडकास्टनंतर शेवंता पात्रासाठी रिप्लेस म्हणून दिसलेल्या अभिनेत्री कृतिका तुळसकरने व्हिडिओ करत अपूर्वाला चांगलंच सुनावलं. ती म्हणाली ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची ती अन प्रोफेशनल अभिनेत्री मी आहे.नमस्कार!मी कृतिका तुळसकर.आताच थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला.त्या व्हिडिओमध्ये माझ्या आधी जिने शेवंताची भूमिका साकारली होती,तिचं असं म्हणणं आहे की, मी अन प्रोफेशनल अभिनेत्री आहे. तिला मी हे सांगू इच्छिते की, अनप्रोफेशनल याला म्हणतात..’सेटवर वेळेत न येणं,दिग्दर्शकाला वाट पाहायला लावणं,इतर कलाकारांशी नीट न वागणं, निर्मात्याशी नीट न वागणं आणि माझ्याचमुळे या मालिकेचे टीआरपी वाढतोय असं माझं सगळ्या कलाकारांना दाखवणं..याला अन प्रोफेशनल म्हणतात.’

ती पुढे म्हणाली ‘एखादा निर्माता जेव्हा मालिकेसाठी लाखो रुपये खर्च करतो.. तेव्हा त्या सिरीयलचा कलाकारांचा तंत्रज्ञांचा विचार न करता, आपण सोडून गेलो तर या मालिकेचे काय होईल..सगळ्यांच्या पोटापाण्याचं काय होईल, याचा विचार न करता मालिका सोडून जाणं याला अनप्रोफेशनल म्हणतात. आणि याशिवाय प्रोफेशनल याला म्हणतात ‘एका रात्रीत मालिकेसाठी उभे राहणं,कुठलीही पार्श्वभूमी नसताना मालिकेतल्या भूमिकेला न्याय देणं..याला प्रोफेशनल म्हणतात’असं कृतिका म्हणाली.

अपूर्वाने ‘नव्या अभिनेत्रीचा फोन अपेक्षित’ असल्याच्या वक्तव्यावर कृतिका म्हणाली ‘ती असं म्हणाले की मी तिला फोन करायला हवा होता. का? तिची माझी ओळख आहे?आपण मैत्रिणी आहोत का? नाही! एक अभिनेत्री म्हणून जर माझ्याकडे एखादी संधी चालून आली, तर त्या संधीचं सोनं कसं करावं याचा विचार मी करणार की फोन करून काय ग बाई काय झालं?का सोडलीस तू मालिका? नेमकं झालंय काय, याविषयी विचारणार?.. असो, मी माझं काम शंभर टक्के केलेलं आहे. याशिवाय मी तिला विचारलं यासाठी मी बांधील नाही. माझ्या प्रोफेशनल आणि अन प्रोफेशनलीजम बद्दल बोलण्याचा कोणाला काहीच अधिकार नाही. कारण आम्ही एकत्र काम केलेलं नाही.त्यामुळे मी काय करते कसं काम करते हे कोणाला माहितीच नाही.आपण पॉडकास्टमध्ये आजकाल सरळ उत्तर देतो.याचा विचारही करत नाही की आपण समोरच्या व्यक्तीला कधी भेटलोही नाहीय. मला असं वाटतं की, यापुढे माझ्या बाबतीत बोलताना थोडासा विचार करून बोलावं.तर याला आपण प्रोफेशनलीज म्हणू..नाही का? ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं आहे,त्यांनाच माझ्या प्रोफेशनलीजम बद्दल बोलण्याचा खरा अधिकार आहे. बाकी, प्रत्येक मत फक्त मत असतं.धन्यवाद!’असं कृतिका म्हणाली. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या व्हिडिओची सध्या एकच चर्चा आहे.

अपूर्वा नेमळेकर नेमकं काय म्हणाली होती?

‘मालिका सोडल्यावर मला भयंकर दुःख झालं. जी कोणती अभिनेत्री ही भूमिका साकारणार होती तिच्याकडून मला एक फोन अपेक्षित होता.पण नेमकं काय झालं हे तिने जाणून सुद्धा घेतलं नाही.असं कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो त्यामुळे मी दुर्लक्ष केलं.प्रत्येक जण एवढं समजूतदार आणि प्रोफेशनल नसतं, हे मला समजलं’असं ती म्हणाली होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *